राशिवडेत विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:17 AM2021-06-10T04:17:14+5:302021-06-10T04:17:14+5:30
ते राशिवडे येथील नागेश्वर हायस्कूलमध्ये सुरु करण्यात आलेल्या पंचवीस बेडच्या विलगीकरण सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे ...
ते राशिवडे येथील नागेश्वर हायस्कूलमध्ये सुरु करण्यात आलेल्या पंचवीस बेडच्या विलगीकरण सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष वि. ज्ञा. पाटील होते.
यावेळी राशिवडेचे लोकनियुक्त सरपंच कृष्णात पोवार यांनी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून गाव कोरोना मुक्त करण्याचे दक्षता कमिटीचे प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांबळे, माजी सरपंच सागर धुंदरे यांनी आपले मनोगत व्यक्त केली.
उपसरपंच अनिल वाडकर, माजी उपसरपंच डॉ. जयसिंग पाटील, रंगराव चौगले, जी.ए.मठपती, किरण निल्ले, सुभाष पाटील, डॉ. अमोल केळकर, सुभाष लाड मुख्याध्यापक नामदेव कापसे, दत्ता देसाई, अजित मगदूम, ग्रा.पं.सदस्या स्वाती पाटील, अनिता लाड, स्वप्नाली पाटील, भारती टिपुगडे, आंबुबाई चांदणे आदीसह राशिवडे व राधानगरी वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. स्वागत ग्रामविकास अधिकारी शिवाजी आरडे यांनी तर आभार सम्राटसिंह पाटील यांनी मानले.
फोटो ओळी
राशिवडे : विलगीकरण सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. राजेंद्र शेटे, सरपंच कृष्णात पोवार, माजी सरपंच सागर धुंदरे, उपसरपंच अनिल वाडकर, डॉ. राजेंद्र कांबळे आदी.