वडगावात अलगीकरण कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:04+5:302021-05-26T04:26:04+5:30
पेठवडगाव : कोरोनाबाधित रुग्णांच्या लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी वडगाव पालिकेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह येथे ...
पेठवडगाव : कोरोनाबाधित रुग्णांच्या लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी वडगाव पालिकेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह येथे अलगीकरण कक्षाचे उद्घाटन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्याहस्ते करण्यात आले.
शहरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रांतांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी अलगीकरण कक्ष सुरू करावा, अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊ नये, कोविड संसर्गामुळे प्रादुर्भाव वाढू नये म्हणून या कक्षाची सोय करण्यात आली आहे.
यावेळी पृथ्वी फौन्डेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संतोष गाताडे यांच्यावतीने मोफत जेवण देण्यात येणार आहे. यावेळी संतोष गाताडे, कालिदास धनवडे, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
पेठवडगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह येथे पालिकेच्यावतीने अलगीकरण कक्षाचे उद्घाटन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले. शेजारी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, संतोष गाताडे, कालिदास धनवडे आदी उपस्थित होते. (छाया : संतोष माळवदे)