दुधाळीतील अत्याधुनिक एअर रायफल रेंजचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:54 AM2021-01-05T11:54:58+5:302021-01-05T11:57:16+5:30
Politics Kolhapur- नेमबाजी क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होत आहेत. त्यांना शासनाकडून प्रशासकीय सेवेत नोकरीच्या संधीही मिळत आहे. त्यामुळे युवा पिढीने नेमबाजी या क्रीडा प्रकाराकडे करिअरचे माध्यम म्हणून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. दुधाळी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंजच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापूर : नेमबाजी क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होत आहेत. त्यांना शासनाकडून प्रशासकीय सेवेत नोकरीच्या संधीही मिळत आहे. त्यामुळे युवा पिढीने नेमबाजी या क्रीडा प्रकाराकडे करिअरचे माध्यम म्हणून पाहावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. दुधाळी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंजच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, दिवंगत सखाराम बापू खराडे आणि रायफल महर्षी जयसिंगराव कुसाळे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या शूटिंग रेंजला शूटिंगची मोठी परंपरा निर्माण झाली आहे. कोल्हापूरला शूटिंगला जो इतिहास आहे. तो यापुढेही कायम राहील. खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देऊ.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मॅन अँड वूमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.