अर्जुनवाडा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:29+5:302021-04-28T04:26:29+5:30
तुरंबे : राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावचे लोकनियुक्त सरपंच शरद पाटील यांनी गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे करून गावचे रुपडे ...
तुरंबे :
राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावचे लोकनियुक्त सरपंच शरद पाटील यांनी गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे करून गावचे रुपडे बदलले आहे. शिक्षण,आरोग्य याच बरोबर पायाभूत सुविधा ग्रामस्थांना देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केले. गावातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कुस्तीची पंढरी म्हणून अर्जुनवाडा गावची ओळख सर्वत्र आहे. लोकनियुक्त सरपंच शरद पाटील यांनी तीन वर्षात गावात कोट्यवधी रुपयाची विकास कामे खेचून आणली यामुळे गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. नामदार हसन मुश्रीफ , खासदार संभाजीराजे, ए. वाय. पाटील आणि लोकवर्गणीतून गावातील विकास कामे केली आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, यांच्या हस्ते वैकुंठधाम व विविध विकास कामाचे उद्घाटन केले. यावेळी ए. वाय. पाटील म्हणाले लोकनियुक्त सरपंच शरद पाटील यांचा गावाच्या विकासात मोलाचा वाटा आहे. त्यांनी उभारलेल्या वैकुंठधाम भूमीत ग्रामस्थांना निश्चितच वेगळा आनंद मिळेल. दूरदृष्टी ठेवून बांधलेल्या वैकुंठधाम मध्ये ऑक्सिजन पार्कची निर्मिती झाली आहे. यामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांबरोबर तरुणांनाही याचा निश्चितच फायदा होईल याचबरोबर गायरानात तयार केलेले पटांगणांमुळे तरुणांना खेळाबरोबर चांगला व्यायाम ही करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बाजार समिती संचालक नेताजी पाटील, शरद पाटील, नामदेव चौगुले, शहाजी बरगे, पंडित पाटील, दिनेश माने, जालिंदर पाटील, विष्णुपंत यादव, विलास पाटील, संदीप पाटील, बाजीराव किल्लेदार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.