माले, कोडोली परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:41+5:302021-03-17T04:23:41+5:30
परिसरामधील मोटारसायकल चोरणे, मोटारसायकलमधील पेट्रोल काढणे, घरासमोरील ठेवलेल्या वस्तू, सायकली, मोबाईल चोरीस जात आहेत. पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी ...
परिसरामधील मोटारसायकल चोरणे, मोटारसायकलमधील पेट्रोल काढणे, घरासमोरील ठेवलेल्या वस्तू, सायकली, मोबाईल चोरीस जात आहेत. पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी करूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. सध्या परिसरामध्ये महागडी जनावरे, शेळ्या, बकरी, रासायनिक खते चोरणाऱ्या टोळ्या अधून-मधून कार्यरत होत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
भुरट्या चोरीचे प्रकार वाढले आहेत; पण पोलिसांपर्यंत येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण कमी आहे. पोलीस ठाण्यात जाऊन आणखी कोठे कटकट पाठीमागे लावून घ्यायची, असा विचार नागरिकांतून केला जात आहे. अनेक तरुण परिसरामध्ये खुलेआम चोऱ्या करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी पोलिसांनी याबाबतीत दक्ष राहून अशा चोरांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.