कारखाली सापडून बालिका ठार, लोहार वसाहत येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:27 PM2019-01-16T17:27:06+5:302019-01-16T17:28:19+5:30

काकाची गाडी आली असे म्हणत आडवी आलेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा कारच्या धडकेत गंभीर जखमी होवून दूर्देवी मृत्यू झाला. भक्ती दीपक वडनकर (रा. लोणार वसाहत, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घरासमोरच घडली.

The incident took place in the Black Sea area under the control of a child, under the influence of blacksmith | कारखाली सापडून बालिका ठार, लोहार वसाहत येथील घटना

कारखाली सापडून बालिका ठार, लोहार वसाहत येथील घटना

Next
ठळक मुद्देकारखाली सापडून बालिका ठारलोहार वसाहत येथील घटना

कोल्हापूर : काकाची गाडी आली असे म्हणत आडवी आलेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा कारच्या धडकेत गंभीर जखमी होवून दूर्देवी मृत्यू झाला. भक्ती दीपक वडनकर (रा. लोणार वसाहत, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घरासमोरच घडली.

दिपक वडनकर व त्यांचे भाऊ दिनेश वडनकर हे लोणार वसाहत येथे राहण्यास आहेत. त्यांचा ट्रक बॉडी करण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी दिनेश हे कार घेऊन कामाच्या ठिकाणी गेले होते. काही वेळाने ते परत आहे. यावेळी भक्ती आजीसोबत दारात बसली होती. काकांची गाडी आली असे म्हणत ती अचानक कारसमोर आली.

दिनेश यांना कार आवरता न आल्याने तिला धडक बसली. डोक्याला गंभीर दूखापत होवून ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. अचानक घडलेल्या अपघाताने वडनकर कुटूंबिय भांबावून गेले. त्यांनी त्याचा कारमधून शाहुपूरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

कोवळ्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहून आई-वडीलांनी केलेला अक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे लोणार वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ, असा परिवार आहे. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
 

 

Web Title: The incident took place in the Black Sea area under the control of a child, under the influence of blacksmith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.