दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांची झोप उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 04:35 PM2020-06-03T16:35:47+5:302020-06-03T16:36:35+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. रोज जिल्ह्यात चोरीच्या घटनांच्या तक्रारी पोलीस दप्तरी नोंद होत आहेत. बुधवारी जिह्यात विविध चार ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारीच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्या आहेत. त्यामध्ये शहरामध्ये शाहूपुरीत दोन तर लक्ष्मीपुरीत एक अशा घटनांची शहरात नोंद झाली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. रोज जिल्ह्यात चोरीच्या घटनांच्या तक्रारी पोलीस दप्तरी नोंद होत आहेत. बुधवारी जिह्यात विविध चार ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडल्याच्या तक्रारीच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्या आहेत. त्यामध्ये शहरामध्ये शाहूपुरीत दोन तर लक्ष्मीपुरीत एक अशा घटनांची शहरात नोंद झाली आहे.
शहरात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच गुजराती लॉज परिसरात जय आनंद खाटक (वय ४८, रा. कोगे, ता. करवीर) यांनी उभी केलेली सुमारे १२ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताचे चोरून नेली. त्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
शिवाय ताराराणी चौकातील अग्नीशमन दलानजीक नरेंद्र भाऊराव पराते (रा. प्लॉट नं. १४, शांतीबन कॉलनी, देशमुख हायस्कूलसमोर, सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) यांनी आपली सुमारे १० हजार रुपये किमतीची दुचाकी उभी केली असता अज्ञाताने चोरून नेली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेनजीक कोरे हॉस्पीटलनजीक सचिन भीमराव पोवार (रा. राशीवडे, ता. राधानगरी) यांनी आपली ३० हजार रुपये किमतीची उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली.
या दोन्हीही घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. शिवाय कागल एस.टी. स्टॅडशेजारी शिवाजी पुतळा परिसरातून अभिजित गोविंद कागवाडे (४४, रा. माळी गल्ली, कागल) यांची ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीस गेली. त्याची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.