अंबाबाईच्या तिजोरीत दीड कोटीची भर, रक्कम मोजण्यासाठी ५० कर्मचारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 06:53 PM2022-01-15T18:53:56+5:302022-01-15T18:54:35+5:30

मंदिर आवारात ९ देणगी पेट्या असून, यातील रक्कम मोजण्यासाठी चार दिवस ५० कर्मचारी लावण्यात आले होते.

Income of Rs. 1 crore 60 lakh 64 thousand 643 from the donation boxes of Shri Ambabai Mandir | अंबाबाईच्या तिजोरीत दीड कोटीची भर, रक्कम मोजण्यासाठी ५० कर्मचारी 

अंबाबाईच्या तिजोरीत दीड कोटीची भर, रक्कम मोजण्यासाठी ५० कर्मचारी 

Next

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या देणगी पेट्यांमधून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला गेल्या दोन महिन्यांत १ कोटी ६० लाख ६४ हजार ६४३ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. मंदिर आवारात ९ देणगी पेट्या असून, यातील रक्कम मोजण्यासाठी चार दिवस ५० कर्मचारी लावण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी ही मोजणी संपली.

कोरोनामुळे एक वर्षाहून अधिक काळ अंबाबाई मंदिर बंद होते, त्यामुळे उत्पन्न घटले. तसेच देवस्थानच्या माजी पदाधिकाऱ्यांनी वारेमाप खर्च केल्याने अंबाबाईची तिजोरीच रिकामी झाली होती. पण, नवरात्रोत्सवात मंदिर उघडल्यापासून उत्पन्नात पुन्हा घसघशीत वाढ झाली आहे. 

नवरात्रोत्सव व दिवाळीच्या काळात असे मिळून १ कोटी ३० लाखांची देणगी जमा झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी ११ तारखेपासून पुन्हा देणगी पेट्या उघडण्यास सुरुवात झाली. चार दिवसांत ९ पेट्यांमधील मोजणी पूर्ण झाली. त्यासाठी ५० कर्मचारी काम करीत होते. यापुढे दर दोन महिन्यांनी देणगी पेट्या उघडण्यात येणार आहेत.

दिवस व जमा झालेली रक्कम

मंगळवार : ३६ लाख ४८ हजार ५४७
बुधवार : ५० लाख
गुरुवार : ४० लाख ५१ हजार २१३
शुक्रवार : ३३ लाख ६४ हजार ७०३

Web Title: Income of Rs. 1 crore 60 lakh 64 thousand 643 from the donation boxes of Shri Ambabai Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.