पंचवीस साड्यांची विक्रीतून पावणे आठ हजारांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:28+5:302021-09-13T04:24:28+5:30
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीला भाविकांकडून अर्पण केलेल्या प्रसाद साड्यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने विक्री सुरू केली आहे. ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीला भाविकांकडून अर्पण केलेल्या प्रसाद साड्यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने विक्री सुरू केली आहे. रविवारी दुसऱ्या दिवशी २५ साड्यांच्या विक्रीतून सात हजार ७७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
देवस्थानच्या त्र्यंबोली देवस्थान येथील सभागृहात हा उपक्रम सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप आणि गौरींचे आगमन असल्यामुळे शनिवार (दि. ११) च्या तुलनेत उपक्रमास कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दिवसभरात केवळ २५ साडीप्रसादाची विक्री झाली. त्यातून ७ हजार ७७८ उत्पन्न मिळाले. शनिवारी पहिल्या दिवशी १४७ साड्यांची विक्री झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम त्र्यंबोली मंदिराची परिसरात सुरू करण्यात आला आहे. वाढता प्रतिसाद पाहून हा उपक्रम आता शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करण्याचा विचार देवस्थान समितीतर्फे सुरू आहे, अशी माहिती सचिव शिवराज नाईकवडे यांनी दिली.