कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आयकर विभागाचा छापा, खासगी कारखान्याच्या भागिदारीवरुन चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 12:11 PM2022-08-26T12:11:57+5:302022-08-26T12:12:58+5:30

आयकर विभागाने छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली

Income tax department raid in Shirol taluk of Kolhapur district, investigation on the participation of private factory | कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आयकर विभागाचा छापा, खासगी कारखान्याच्या भागिदारीवरुन चौकशी

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आयकर विभागाचा छापा, खासगी कारखान्याच्या भागिदारीवरुन चौकशी

Next

निनाद मिरजे

उदगाव : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील तालुक्याचे सभापती पद भूषविलेल्या महिलेच्या पतीच्या घरावर आयकर विभागाने काल, गुरूवारी सकाळी पाऊणे आठ वाजता छापा टाकला. जयसिंगपूर-संभाजीपूर येथील  बंगल्यांची पाहणी करून सांगलीतील असलेल्या प्लॉटचीही पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत या पथकाकडून कागदपत्रे व चौकशीचे काम सुरू होते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

नांदेड, नाशिक, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यात भागिदारी आहे. खासगी कारखान्याच्या तपासातूनच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली. या पथकाने घरातील सर्व कपाटे, विविध साहित्य, चार चाकी वाहने, जनावरांचा गोठा यासह विविध ठिकाणी असलेल्या कागपपत्रांची झाडाझडती केली. त्यानंतर दोन अधिकारी यासर्व कागदपत्रांची पडताळणी करीत होते. तर अन्य अधिकारी चौकशी करीत होते. याठिकाणी पोलिस बंदोबस्तही  ठेवण्यात आला होता.

दुपारच्या सुमारास या पथकाने आपला मोर्चा जयसिंगपूर, संभाजीपूर येथील असलेल्या आलिशान बंगल्याची पाहणी करून तपासणी केली. त्यानंतर सांगली येथील प्लॉटचीही पाहणी करण्यात आली. हे पथक दुपारी पुन्हा अर्जुनवाड येथे आले. आणि पुन्हा कागदपत्रांची जुळवाजूळव करून चौकशीचे काम सुरू होते. संबंधीत अधिकार्‍यांना पत्रकारांनी कारवाईबाबत माहिती विचारली असता. अधिकाऱ्यांनी आम्ही आताच काही माहिती देवू शकत नाही. तुम्ही समजून घ्या, असे म्हणत पुढील चौकशी सुरू ठेवली होती.

Web Title: Income tax department raid in Shirol taluk of Kolhapur district, investigation on the participation of private factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.