पालेश्वर धबधब्यात कोल्हापूरच्या आयकर अधिकाऱ्याचा मृत्यू, पोहताना पाण्यात घुटमळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:54 AM2022-07-25T11:54:59+5:302022-07-25T11:58:30+5:30
कुटूंबियांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला
मलकापूर : माणपैकी ठाणेवाडी (ता. शाहूवाडी) येथील पालेश्वर धरणावरील धबधब्यावर कुटुंबासमवेत वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या आयकर अधिकारी प्रकाश रामचंद्र मोहिते (वय ५८, मुळ रा. कराड जि. सातारा, सध्या रा. शिवाजी पार्क कोल्हापूर) याचा पोहताना पाण्यात घुटमळून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल, रविवारी घडली. याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश मोहिते हे आयकर विभागात कार्यरत आहेत. रविवारी त्यांचे मेहुणे उदयसिंह वसंतराव जाधव खासगी सिक्युरिटी (रा.मांगूर ता. चिकोडी जि. बेळगाव, सध्या राजारामपूरी कोल्हापूर) हे वर्षा सहलीसाठी कुटूंबासोबत पालेश्वर धबधब्यावर आले होते.
दरम्यान प्रकाश मोहिते हे धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना घुटमळले. कुटूंबियांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांने घोषित केले.