अचानक आंदोलनाने मुद्रांक शुल्कमध्ये गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:33 PM2020-11-12T13:33:01+5:302020-11-12T13:34:33+5:30
goverment, stamp, kolhapurnews बुलडाणा येथे मुद्रांक शुल्कच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील या खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी तीननंतर अचानक काम बंद आंदोलन केल्याने लोकांची चांगलीच गैरसोय झाली.
कोल्हापूर : बुलडाणा येथे मुद्रांक शुल्कच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील या खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी तीननंतर अचानक काम बंद आंदोलन केल्याने लोकांची चांगलीच गैरसोय झाली.
उद्या, शुक्रवारपासून सलग चार दिवस सुट्या आहेत. त्यामुळे अनेक पक्षकारांनी आपले प्रलंबित असलेले दस्त करण्यासाठी बुधवारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात बरीच गर्दी केली होती. एकतर ८० वर्षांहून जास्त वयाची महिला मृत्युपत्राचा दस्त करण्यासाठी तिथे आली होती.
ज्यांचे खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले आहेत, पैशाचीही देवाणघेवाणही झाली आहे. त्यांना दस्तनोंदणीच्या वेळा आधीच दिल्या होत्या; परंतु अचानक कामकाज थांबवल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. कोणत्याही गोष्टीचा निषेध करताना काळ्या फिती लावून काम करावे अथवा कामकाज बंद राहणार आहे, असे किमान एक दिवस अगोदर जाहीर करावे; यामुळे पक्षकारांची गैरसोय होणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.