व्हिजन ॲग्रो कंपनीविरोधात तक्रारींची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:17 PM2020-10-08T12:17:27+5:302020-10-08T12:18:47+5:30
Crime News, kolhapurnews, police व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्टस व व्ही. ॲण्ड के. ॲग्रोटेक प्रॉडटक्टस् प्रा. लि. या कंपनीविरोधात फसवणुकीबाबत तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून संशयितांचा आरोपींचा शोध सुरू आहे.
कोल्हापूर : व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्टस व व्ही. ॲण्ड के. ॲग्रोटेक प्रॉडटक्टस् प्रा. लि. या कंपनीविरोधात फसवणुकीबाबत तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून संशयितांचा आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, व्हिजन ग्रीन कंपनीने मल्टिलेव्हल मार्केटिंग ड्रीम प्लॅनची स्वप्ने दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा शाहूपुरीत दाखल झाला. याप्रकरणी गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.
कंपनीचा मुख्य व्यवस्थापकीय संचालक संशयित विकास खुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी असणारी त्याची पत्नी विद्या खुडे, संचालक प्रसाद पाटील, सुशील पाटील व तुकाराम पाटील या पाचजणांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित संचालक सुशील पाटील याच्यावर यापूर्वी कारवाई केली होती पण पसार असलेल्या इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार तक्रारदारांच्या तक्रारी वाढत आहेत. त्याची माहिती घेण्याचे तसेच तपास करण्याचे काम सुरू असल्याचे तपास यंत्रणेने सांगितले.