गडहिंग्लज-भडगाव पुलाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:45+5:302021-08-26T04:27:45+5:30

मुंबई येथे मंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनी पत्र दिले आणि सविस्तर चर्चाही केली. यावेळी जि. प. सदस्य उमेश ...

Increase the height of Gadhinglaj-Bhadgaon bridge | गडहिंग्लज-भडगाव पुलाची उंची वाढवा

गडहिंग्लज-भडगाव पुलाची उंची वाढवा

Next

मुंबई येथे मंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनी पत्र दिले आणि सविस्तर चर्चाही केली. यावेळी जि. प. सदस्य उमेश आपटे, पं. स. सदस्य विद्याधर गुरबे हेही उपस्थित होते.

पत्रात म्हटले आहे की, १९६० मध्ये भडगाव पूल बांधण्यात आला आहे. परंतु, नदीपात्र गाळाने भरल्यामुळे वारंवार येणाऱ्या महापुरामुळे हा पूल पाण्याखाली जाऊन गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील जनजीवन विस्कळीत होते.

दरम्यान, या पुलाच्या विस्तारीकरणासाठी दोन कोटीची तरतूद करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी शेतजमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेतील अडचणीमुळे काम रेंगाळले आहे. त्यानंतर यावर्षीच्या महापुरातदेखील हा पूल आठ दिवस पाण्याखालीच राहिला. त्यामुळे लवकरात लवकर पुलाची उंची वाढविणे आणि विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

फोटो ओळी :

मुंबई येथे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना विद्याधर गुरबे यांनी पत्र दिले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, उमेश आपटे उपस्थित होते.

क्रमांक : २५०८२०२१-गड-०९गडहिंग्लज :

गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलाची उंची वाढवा आणि विस्तारीकरण करा, अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना पत्राद्वारे केली आहे.

मुंबई येथे मंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनी पत्र दिले आणि सविस्तर चर्चाही केली. यावेळी जि. प. सदस्य उमेश आपटे, पं. स. सदस्य विद्याधर गुरबे हेही उपस्थित होते.

पत्रात म्हटले आहे की, १९६० मध्ये भडगाव पूल बांधण्यात आला आहे. परंतु, नदीपात्र गाळाने भरल्यामुळे वारंवार येणाऱ्या महापुरामुळे हा पूल पाण्याखाली जाऊन गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील जनजीवन विस्कळीत होते.

दरम्यान, या पुलाच्या विस्तारीकरणासाठी दोन कोटीची तरतूद करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी शेतजमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेतील अडचणीमुळे काम रेंगाळले आहे. त्यानंतर यावर्षीच्या महापुरातदेखील हा पूल आठ दिवस पाण्याखालीच राहिला. त्यामुळे लवकरात लवकर पुलांची उंची वाढविणे आणि विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

फोटो ओळी : मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विद्याधर गुरबे यांनी पत्र दिले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, उमेश आपटे उपस्थित होते.

क्रमांक : २५०८२०२१-गड-०९

Web Title: Increase the height of Gadhinglaj-Bhadgaon bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.