कोतेतील वीज पोलची उंची वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:38+5:302020-12-27T04:18:38+5:30

धामोड : कोते (ता. राधानगरी) येथे शुक्रवारी गवताने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला शॉर्टसर्किटने आग लागून यात शेतकऱ्यासह ट्रॅक्टरचालकाचे मोठे आर्थिक ...

Increase the height of the power pole in the cot | कोतेतील वीज पोलची उंची वाढवावी

कोतेतील वीज पोलची उंची वाढवावी

googlenewsNext

धामोड : कोते (ता. राधानगरी) येथे शुक्रवारी गवताने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला शॉर्टसर्किटने आग लागून यात शेतकऱ्यासह ट्रॅक्टरचालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. महावितरणच्या विद्युत तारा रस्त्यापासून कमी उंचीच्या अंतरावरच लोंबकळत असल्याने हा प्रकार घडला. यानंतर असा प्रकार होऊ नये याची कार्यतत्परता दाखवत विद्युत वितरण कंपनीने तत्काळ या पोलची उंची वाढवून जमिनीपासून तारांच्या उंचीचे अंतर वाढविले. याबाबत ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत असून अधिकारी व व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.

शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कोते खामकरवाडी रोडवर दोन हजार गवतांच्या पेंड्या घेऊन खामकरवाडीकडे जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्याचे व ट्रॅक्टर मालकाचे मोठे नुकसान झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यापुढे असा प्रकार उद्भवू नये म्हणून विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी तत्काळ रस्त्यावरील या दोन पोलची उंची वाढवत जमीन व तारा यांच्यातील अंतर वाढवून घेतल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे .

प्रतिक्रिया

शुक्रवारच्या घटनेने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या मुख्य मार्गावर असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून त्रिमूर्ती कंट्रक्शन शिरगाव यांच्याकडून तत्काळ हे काम करून घेतले. यात या ठेकेदारांचेही मोलाचे सहकार्य मिळाले .

श्री . सुशांत निकम

(कनिष्ठ अभियंता हसूर सबस्टेशन )

फोटो ओळी - कोते (ता. राधानगरी) येथील शुक्रवारच्या जळीत घटनेनंतर लोंबकळणाऱ्या तारांची उंची वाढवताना कर्मचारी.

छाया - श्रीकांत ऱ्हायकर

Web Title: Increase the height of the power pole in the cot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.