गावनिहाय आराखडा करुन तपासण्या वाढवा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 06:09 PM2021-06-02T18:09:14+5:302021-06-02T18:12:46+5:30

CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्युदर कमी करण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा, रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्या, चांगले काम करत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण अन्य गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगीकरण कक्ष सुरु करा अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिल्या.

Increase inspections by village wise planning: Collector | गावनिहाय आराखडा करुन तपासण्या वाढवा : जिल्हाधिकारी

कोरोना नियंत्रणासाठी सर्व अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी विभागप्रमुख व विविध पथकांच्या प्रमुखांना मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्देगावनिहाय आराखडा करुन तपासण्या वाढवा : जिल्हाधिकारीपथक प्रमुखांच्या बैठकीत दौलत देसाई यांनी दिल्या सुचना 

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्युदर कमी करण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा, रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्या, चांगले काम करत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण अन्य गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगीकरण कक्ष सुरु करा अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिल्या. पूरामुळे बाधित होणाऱ्या भागातील ज्येष्ठ नागरिक, मदतकार्यात सहभागी नावाडी व रेस्क्यू फोर्सचे तरुण यांचे लसीकरण प्राधान्याने करुन घेण्याचा निर्णय यावेळी झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या पथक प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्ण संख्या, मृत्यदर, तपासण्यांची सद्यस्थिती, लसीकरण, नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट, हॉस्पिटल ऑडिट, कोविड केंद्राची तपासणी व सुविधा, महाआयुष सर्व्हे, लसीकरण या विषयांचा तालुकानिहाय आढावा घेतला.

ते म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अँटीजन किट्स चे योग्य प्रमाणात वाटप करावे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. हातकणंगले, शिरोळ, करवीर अशा रुग्णदर अधिक असणाऱ्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात.

महा आयुष सर्व्हे अंतर्गत लक्षणे आढळणाऱ्या ६० वर्षावरील नागरिकांची तात्काळ तपासणी करुन घेवून बाधितांना वेळेत उपचार मिळवून द्या, या सर्व्हेचे काम गतीने पूर्ण करा. रुग्णालयांच्या फायर, इलेक्ट्रिक, ऑक्सिजन ऑडिट मध्ये आढळून आलेल्या त्रुटींची तात्काळ पूर्तता करुन घ्यावी, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची कामे वेगाने पूर्ण करुन घ्यावीत.

 

Web Title: Increase inspections by village wise planning: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.