दूध खरेदी दरवाढ ही शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:37+5:302021-07-17T04:19:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर ...

The increase in milk purchase price is a respect for the sentiments of the farmers | दूध खरेदी दरवाढ ही शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर

दूध खरेदी दरवाढ ही शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर केल्याची भावना जिल्ह्यातील दूध संस्थांनी व्यक्त केल्या.

संघाने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महादेव दूध संस्‍था चांदे, दत्‍त संस्‍था वाकरे, कै. शिवाजी सीताराम पाटील दूध संस्‍था आमशी, कै. राऊ पाटील दूध संस्‍था हसूर दु., दत्त दूध संस्था रेंदाळ, कृष्‍णशक्‍ती दूध संस्‍था सेनिक टाकळी, अनंत कुलकर्णी दूध संस्‍था अब्दुललाट, कामधेनू दूध संस्‍था हलसवडे, शहिद जवान दूध संस्‍था सावर्डे, भैरवनाथ दूध संस्‍था रागोळी, यशोधन दूध संस्‍था मौजे सांगाव, महालक्ष्‍मी महिला दूध संस्‍था बहिरेश्‍वर, नानूबाई चौगले दूध संस्‍था माजगाव या संस्‍थेमार्फत अध्यक्ष विश्वास पाटील व संचालकांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, ‘गोकुळ’ हा सर्वसामान्‍य दूध उत्‍पादकांचा प्रमुख आधार आहे. लाखो दूध उत्‍पादकांचा विश्‍वास संपादन करत असताना कामकाज व व्‍यवस्‍थापनामध्‍ये महाराष्‍ट्रात क्रमांक १ चा संघ म्हणून ओळख निर्माण केली आहे. या वेळी संचालक, कार्यकारी संचालक, अधिकारी व दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

फोटो ओळी :

‘गोकुळ’ने दूध खरेदी दरात वाढ केल्याबद्दल विविध दूध संस्थांच्यावतीने संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संचालक उपस्थित होते. (फोटो-१६०७२०२१-कोल-गोकुळ सत्कार)

Web Title: The increase in milk purchase price is a respect for the sentiments of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.