भाजी मंडईतून मोबाईल चोरीच्या घटनात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:42 AM2021-03-04T04:42:37+5:302021-03-04T04:42:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरातील भाजीपाला खरेदीसाठी भाजी मंडईत गेलेल्या ग्राहकांच्या मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गंगावेश शाहू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरातील भाजीपाला खरेदीसाठी भाजी मंडईत गेलेल्या ग्राहकांच्या मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गंगावेश शाहू उद्यान भाजी मंडई व शाहूपुरी नार्वेकर भाजी मंडईतून रोज मोबाईल चोरीला जात आहेत. देवकर पाणंद येथील राजू सदानंद मंडलिक (वय ४९) हे गंगावेश शाहू उद्यान भाजी मंडईमध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांच्या खिशातील चार हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला. त्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. गेल्या दोन दिवसात भाजी मंडईतून मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत.
कडगावनजीक दुचाकी घसरुन तरुण जखमी
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे दुचाकी घसरुन पडल्याने त्यावरील चालक विनोद शेरसिंग नेपाळी (वय २६, रा. सांगाव, ता. कागल) हे जखमी झाले. बेळगावहून ते कडगाव येथे जात असताना हा अपघात घडला. जखमीवर कोल्हापुरात सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची नोंद सीपीआर पोलीस चाैकीत झाली आहे.
अपघातात दोघे जखमी
कोल्हापूर : कणेरीवाडी ते कोल्हापूर असा दुचाकीवरुन प्रवास करताना गोकुळ शिरगावनजीक दुचाकी घसरुन पडली. त्या अपघातात अजित अशोक हेगडे (वय ४६), राहुल शिवाजी कुराडे (दोघेही रा. दौलतनगर, राजारामपुरी) हे जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.