खून करून दिशाभूल करण्याच्या प्रकारात वाढ

By admin | Published: March 14, 2016 12:36 AM2016-03-14T00:36:36+5:302016-03-14T00:36:36+5:30

दोन महिन्यांत अकरा खून : पोलिसही अवाक्; पुरावा सापडू नये म्हणून गुन्हेगारांकडून नव्या कल्पना

Increase in murder and misadventure | खून करून दिशाभूल करण्याच्या प्रकारात वाढ

खून करून दिशाभूल करण्याच्या प्रकारात वाढ

Next

एकनाथ पाटील -- कोल्हापूर -हत्या केल्यानंतर त्याचा सुगावा लागू नये, आपल्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचू नयेत, त्यांची दिशाभूल व्हावी, यासाठी आरोपी मृतदेहाची अत्यंत खबरदारीने विल्हेवाट लावीत आहेत. कधी मृतदेहाचे धडच मिळते, तर हात-पाय आणि डोके गायब असते. कधी संपूर्ण मृतदेह सापडतो; पण चेहरा ठेचून वा जाळून विद्रूप केलेला असतो. अशा गूढ खुनांचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यात ११ खून झाल्याने गुन्हेगारांचे संकट पोलिसांना आव्हान बनले आहे.
शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची दर महिन्याला गुन्हेविषयक बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक घेत असतात. गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात खूनसत्र सुरू आहे. विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, कौटुंबिक क्षणिक वादातून आतापर्यंत अकरा खून झाल्याची पोलिस रेकॉर्डला नोंद आहे.

तीन खुनांचे गूढ आजही कायम
वाशी (ता. करवीर) येथील ‘सुतारकी’ नावाच्या उसाच्या शेतात अज्ञात पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोत्यात बांधून ठेवल्याच्या अवस्थेत आढळून आला. वाघबीळ घाटातील झुडपात छिन्नविच्छिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला. त्याचे डोके गायब होते. किडे-मुंग्या लागून धड कुजले होते. त्याचे शवविच्छेदन करण्याची परिस्थिती नव्हती. त्यामुळे करवीर पोलिसांनी त्या जागेवरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले; परंतु हा तरुण कोण? त्याचा खून कोणी केला? हे सर्व प्रश्न आजही तसेच आहेत. शिवाजी पेठेतील हृषिकेश अनिल कोगेकर (वय ३४) याचा कसबा वाळवे गावानजीक उसाच्या शेतामध्ये डोळे बाहेर काढून निर्घृण खून केला गेला. त्याची ओळख पटूनही मारेकऱ्यांचा शोध आजपर्यंत लागलेला नाही.

पालक वर्गात भीती
राजेंद्रनगरात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाला, हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फारच चिंताजनक आहे. अपहरणाच्या घटनांमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक आणि निरीक्षकांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
- प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक

Web Title: Increase in murder and misadventure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.