‘महसूल कर्मचारी’ पतसंस्थेच्या नवीन कर्जमंजूरीला १० लाखांपर्यंत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:18+5:302021-04-02T04:23:18+5:30
कोल्हापूर : जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ७५ वी अधिमंडळाची वार्षिक सभा व्हिडीओ काॅन्फरन्सिंगव्दारे नुकतीच उत्साहात झाली. यामध्ये ...
कोल्हापूर : जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ७५ वी अधिमंडळाची वार्षिक सभा व्हिडीओ काॅन्फरन्सिंगव्दारे नुकतीच उत्साहात झाली. यामध्ये सभासदांच्या मागणीनुसार नवीन कर्जमंजुरीची मर्यादा सात लाखांवरुन दहा लाखांपर्यंत करण्यास मंजुरी देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजन नाळे होते.
सभेच्या सुरुवातीला संस्थेचे माजी सभासद, कोविडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. अध्यक्ष राजन नाळे यांनी अहवाल वाचन केले तसेच सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर केला. चिटणीस सर्जेराव जरग यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांची संचालकांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये उपाध्यक्ष अमित लाड, संतोष वाळके, राहुल शिंदे, गजानन कुरणे, अमोल बोलाईकर, संचालक बी. बी. बोडके, विनायक लुगडे, अमर पाटील, आर. आर. पाटील यांनी सहभाग घेतला. संचालक शंकर गुरव यांनी आभार मानले. या सभेला बहुतांशी सभासद ऑनलाईन उपस्थित होते.