दवाखान्यांतील बेडची संख्या वाढवा पालकमंत्र्याची सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:04 PM2020-08-18T12:04:57+5:302020-08-18T12:14:13+5:30
सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये एनआयव्ही व ऑक्सीजनचे असे तीनशे बेड या आठवड्यात वाढवण्याच्या सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
कोल्हापूर : सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये एनआयव्ही व ऑक्सीजनचे असे तीनशे बेड या आठवड्यात वाढवण्याच्या सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील सुचना केल्या. याअंतर्गत सीपीआरमध्ये शंभर आणि खासगी दवाखान्यांमध्ये दोनशे असे तीनशे बेड या आठवड्यात वाढवण्यात येणार आहेत. यात एनआयव्ही व ऑक्सीजनच्या बेडचा समावेश आहे.
ऑक्साीजनचा टॅकर
बाधीत रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता असते. दोन दिवसांपूर्वी पुण्याहून एक ऑक्सीजनचा टॅकर कोल्हापुरात आला होता. रायगडमध्येही एक ऑक्सीजन प्लॅन्ट असून येथीन एक टँकर मागवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत.