प्रलंबित अहवाल आल्याने रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:21+5:302021-05-12T04:26:21+5:30
वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेवर मोठा ताण आल्यामुळे या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दोन दिवस ...
वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेवर मोठा ताण आल्यामुळे या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दोन दिवस येथील तपासणी थांबविण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या चाचण्या आणि अशातच निर्जंतुकीकरण करण्यासाठी थांबविलेले काम यामुळे सुमारे सात हजार नागरिकांच्या ‘स्वॅब’चे अहवाल प्रलंबित राहिले होते; परंतु प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री दीड वाजेपर्यंत बैठक घेऊन पुणे आणि रत्नागिरीला यातील काही स्वॅब पाठविले होते. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांच्याकडे शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेच्या समन्वयाची जबाबदारी आहे. गेले तीन दिवस शिवदास हे प्रयोगशाळेत तळ ठोकून आहेत. आता पुन्हा ही प्रयोगाशाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे.
मंगळवारी पुणे आणि रत्नागिरी येथून ३५०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर शहरातील ३७५ असून त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात १८८ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. करवीर तालुक्यात १२४ तर इचलकरंजीमध्ये ११३ नवे रुग्ण आढळले आहेत.
कोट
शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेतील उपकरणांचे निजतुंर्कीकरण करण्याची गरज असते. या दरम्यान प्रयोगशाळेतील स्वॅब तपासणीचा वेग मंदावू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन व रुग्णांच्या उपचारामध्ये विलंब होऊ नये यासाठी तातडीने पुणे आणि रत्नागिरीला स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. सध्याच्या स्थितीत शेंडा पार्क येथील प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
डॉ. एस. एस. मोरे
अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर