पेट्रोलिंग वाढवा, वाहने तपासा : वाहनधारकांची थर्मल स्कॅनद्वारेही तपासणी--अभिनव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:00 PM2020-04-30T18:00:17+5:302020-04-30T18:01:24+5:30
कोल्हापूर : शासनाने मालवाहतूक व उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली; त्यामुळे मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येणार आहेत. ...
कोल्हापूर : शासनाने मालवाहतूक व उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली; त्यामुळे मालवाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येणार आहेत. त्यातून ‘कोरोना’चा संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी आता पेट्रोलिंग वाढवावे, वाहनांची काटेकोरपणे तपासणी करावी, असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, ट्रकचालक आणि त्यासोबतच्या दोन व्यक्ती यांची तपासणी नाक्यावर वैद्यकीय तपासणी करावी. थर्मल स्कॅनद्वारेही तपासणी करावी. लोकांपासून जिल्ह्यात संसर्ग येण्याची शक्यता आहे. रमजानच्या काळात नमाज पठणासाठी गर्दी होणार नाही, याची दक्षताही घ्यावी. झोपडपट्टी भागातही लक्ष केंद्रित करावे, त्यासाठी पेट्रोलिंगवर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.