‘कोशियारी’ समितीनुसार पेन्शन वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:38+5:302021-03-04T04:44:38+5:30
गडहिंग्लज : केंद्र शासनाने ‘कोशियारी’ समितीच्या शिफारसीनुसार ९० दिवसांत शिफारसी लागू करून ३ हजार रुपये महागाई भत्ता देण्याचे आश्वासन ...
गडहिंग्लज : केंद्र शासनाने ‘कोशियारी’ समितीच्या शिफारसीनुसार ९० दिवसांत शिफारसी लागू करून ३ हजार रुपये महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आजतागायत ते पूर्ण झालेले दिसत नाही. त्यामुळे कोशियारी समितीच्या शिफारसीनुसार तातडीने पेन्शन वाढ करा, अशी मागणी कॉ. अतुल दिघे यांनी केली.
गडहिंग्लज येथील राम मंदिरामध्ये आयोजित सर्व श्रमिक संघाच्या बैठकीत ते बोलत होते. पेन्शनर संघटनेचे सचिव कॉ. आप्पा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिघे म्हणाले, पेन्शनरांनी आयुष्यभर राबून देशाच्या विकासाला गती दिली. उत्पादन वाढीसह उत्तम सेवा दिली. परंतु, त्यांच्या योगदानाचा मोबदला त्यांना दिलेला नाही.
मंगळवार (९) कोल्हापूर येथील विक्रम हायस्कूलच्या मैदानावर सर्व पेन्शनरांनी एकत्र येऊन भाजप कार्यालयावरील मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले.
यावेळी कॉ. अमृत कोकितकर, कॉ. शांताराम पाटील, कॉ. केरबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस गोविंद कोकितकर, आण्णा शिंदे, मारुती भोसले, पांडुरंग आंबोळे, मारुती पाटील, रेश्मा कांबळे, अशोक स्वाती, दत्तात्रय चौगुले, गोरखनाथ चव्हाण, शामराव पन्हाळकर, तुकाराम देसाई, तम्माण्णा आयवाळे, शंकर चौगुले, शिवाप्पा कांबळे, पुंडलिक कुंभार आदी उपस्थित होते. कॉ. रामजी देसाई यांनी प्रास्ताविक केले. कॉ. पद्मिनी पिळणकर यांनी सूत्रसंचालन केले.