श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील संगमावरील संगम मंदिराला पाण्याने वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 05:50 PM2021-06-17T17:50:07+5:302021-06-17T17:51:48+5:30
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात नऊ फुटाने वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. तर परिसरात दमदार पाउस झालेने पेरणी करून पावसाची वाट पहात असलेला बळीराजा आनंदात आहे.
नृसिंहवाडी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात नऊ फुटाने वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. तर परिसरात दमदार पाउस झालेने पेरणी करून पावसाची वाट पहात असलेला बळीराजा आनंदात आहे.
वाढलेल्या पाणी पातळीमुळे नदीकाठी असलेल्या कुरणात पाणी शिरत असून शेतकरी वर्गाची नदीकाठच्या मोटारी काढण्याची व नदीकाठी असलेले गवत कापून घेणेची धांदल चालू आहे.कृष्णा नदी पेक्षा पंचगंगा नदीच्या पाण्याला जोरात प्रवाह आहे.
दरम्यान, कृष्णा नदीचे पाणी वाढत असल्याने येथील दत्त देव संस्थानचे कर्मचारी यांनी मंदिर परिसरातील नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सुरु केले आहे.
दरम्यान, प्रांत डॉ. खरात व तहसीलदार अपर्णा मोरे यांनी नृसिंहवाडी येथे भेट देऊन पाणी पातळीची पाहणी केली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त व ग्रामपंचायत सदस्य अमोल विभूते उपस्थित होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या आरोग्यविषयी जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. खरात यांनी सांगितले
कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत नऊ फुटाने वाढ झाली असून श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिराजवळील कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल्या संगमेश्वर मंदिराला नदीच्या पाण्याने वेढा दिला आहे. (छाया : प्रशांत कोडणीकर)