ऑनलाइन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाईल, टॅब, इंटरनेटची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:36+5:302021-07-07T04:28:36+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा, महाविद्यालये बंद असून प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू ...

Increased cost of parenting due to online education; Mobile, tab, internet | ऑनलाइन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाईल, टॅब, इंटरनेटची भर

ऑनलाइन एज्युकेशनमुळे पालकांचा वाढला खर्च; मोबाईल, टॅब, इंटरनेटची भर

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने शाळा, महाविद्यालये बंद असून प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. या पद्धतीने पाल्यांना शिक्षण देण्याचा खर्च वाढला आहे. मोबाईल, टॅब, इंटरनेट उपलब्धतेच्या खर्चाची त्यामध्ये भर पडली आहे. कोरोनामुळे बहुतांश कुटुंबांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. त्यातील दोन, तीन अपत्य असणाऱ्या पालकांची मोठी अडचण झाली आहे.

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी शाळा, महाविद्यालये आणि खासगी शिकवणी (प्रायव्हेट क्लासेस) ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिक्षण घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. एक पाल्य असणाऱ्या कुटुंबामध्ये फारशी अडचण नाही. मात्र, दोन अथवा तीन पाल्य असणाऱ्यांना पालकांना मोबाईल अथवा टॅब खरेदी आणि इंटरनेटसाठी दरमहा रिचार्ज करण्याचा खर्च करावा लागत आहे. नवीन १० ते १५ हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करण्यासह दरमहा किमान एक हजार रुपये नेट पॅकसाठी खर्च करावे लागत आहे. त्यासह पाठ्यपुस्तके, वह्यांचा खर्च दरवर्षीप्रमाणे करावा लागला आहे. एकूणच पाहता या ऑनलाइन शिक्षणामुळे पालकांच्या दरमहा खर्चात वाढ झाली आहे.

पॉंईंटर

जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली : ५५३०१

दुसरी : ५७४५२

तिसरी :५७६०९

चौथी : ५७८३४

पाचवी : ५७८४१

सहावी : ५७३९५

सातवी : ५८३२०

आठवी : ५८८००

नववी : ६०२२६

दहावी : ५६७४५

चौकट

किमान एक हजाराने खर्च वाढला

सद्यस्थितीत ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल, टॅब, लॅॅपटॉप, संगणक यांपैकी एक आणि हेडफोन खरेदीसाठी एकूण १० ते ३५ हजार रुपये पालकांना खर्च करावे लागले आहेत. शाळा, महाविद्यालय आणि खासगी शिकवणीतील शिक्षण ऑनलाइन असल्याने दोन ते तीन अपत्य असणाऱ्या पालकांना नेटपॅॅकसाठी दरमहा किमान एक हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्ट फोन, इंटरनेट डेटा याचा येणारा खर्च आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या कुटुंबाला परवडण्यासारखे नाही आहे. उमेद फाउंडेशनतर्फे आतापर्यंत लोकसहभागातून गरजू गरीब चार विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनची मदत केली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शासन, स्वयंसेवी संस्था, समाजाने पुढे यावे, असे आवाहन उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी केले.

दोन मोबाईल अन् इंटरनेटचा खर्च वाढला

मला दोन जुळ्या मुली असून त्या सहावीत, तर मुलगा चौथीमध्ये आहे. त्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी दोन मोबाईल खरेदी केले आहेत. त्यासाठी २० हजार रुपये खर्च झाले. दोन मोबाईलवर इंटरनेटसाठी महिन्याला एक हजार रुपये खर्च होत आहेत.

-राजाराम पात्रे, पात्रेवाडी

माझा एक मुलगा अकरावी, तर दुसरा सहावीमध्ये आहे. अकरावीतील मुलांची खासगी शिकवणीदेखील सुरू आहे. त्याच्यासाठी नवीन मोबाईल घेतला आहे. सहावीतील मुलासाठीदेखील आता घ्यावा लागणार आहे. सध्या नेटपॅॅकसाठी सहाशे रुपये खर्च करावे लागत आहेत.

-उदय म्हेतर, सांगरूळ

चौकट

मुलांचे होतेय नुकसान

कोरोनामुळे सध्या मुलांचे शिक्षण असो की, खेळ हे घरातूनच सुरू आहे. त्यांचा स्क्रीनटाईम वाढला आहे. त्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान होत आहे. त्यांच्यामध्ये चिडचिडपणा, एकाकीपणा वाढत आहे. ते टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांशी संवाद वाढवावा. मुलांचा स्क्रीनटाईम कमी करण्याकडे भर देणे आवश्यक आहे. पालकांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निखिल चौगुले यांनी सांगितले.

050721\05kol_1_05072021_5.jpg

डमी (०५०७२०२१-कोल-स्टार ८८० डमी)

Web Title: Increased cost of parenting due to online education; Mobile, tab, internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.