वाढीव वीज बिले माफ व्हावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:40 AM2020-12-12T04:40:25+5:302020-12-12T04:40:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चुये (वार्ताहर) : कोरोनाने जगभरात थैमान घातले होते. लोकांच्या हाताला काम नव्हते, लोकांचे हाल होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क चुये (वार्ताहर) : कोरोनाने जगभरात थैमान घातले होते. लोकांच्या हाताला काम नव्हते, लोकांचे हाल होत होते. त्यातच महावितरण वीज बिल वाढीव दराने देत असल्याने लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे लाॅकडाऊन काळातील वीज बिले माफ व्हावीत या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आठवले गट) करवीर तालुक्याच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली इस्पुर्लीचे कनिष्ठ अभियंता सुभाष पाटील यांना देण्यात आले. एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी जर बळजबरी करून लाईट कनेक्शन बंद केले तर कोणत्याही कर्मचाऱ्याला घरी सोडले जाणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. सरकारने त्वरित वीज बिल माफ करावे ,अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी करवीर तालुका युवा उपाध्यक्ष संतोष कांबळे, तालुका उपाध्यक्ष बाबासो निगवेकर, करवीर तालुका संघटक सागर इस्पुर्ली, बाजीराव जैताळकर, बबनराव कांबळे, संग्राम कांबळे, विवेक रजपूत, ओंकार कांबळे, संजय कांबळे, आदर्श कांबळे, यश कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : वडकशिवाले महावितरणचे कनिष्ठ अभियंता सुभाष पाटील यांना वाढीव वीज बिल माफ करावीत यासाठीचे निवेदन देताना करवीर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) करवीर तालुक्याचे कार्यकर्ते.