कलिंगडेच्या आवकेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:45+5:302021-02-08T04:20:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उष्मा हळूहळू वाढू लागल्याने लिंबूच्या मागणीत वाढ होत असल्याने दरही काहीसे तेजीत आहेत. दोन ...

Increased inflow of watermelon | कलिंगडेच्या आवकेत वाढ

कलिंगडेच्या आवकेत वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : उष्मा हळूहळू वाढू लागल्याने लिंबूच्या मागणीत वाढ होत असल्याने दरही काहीसे तेजीत आहेत. दोन रुपयाला एक असा लिंबूचा दर आहे. कलिंगडेची आवकही वाढू लागली असून, काळ्या पाठीच्या कलिंगडे वीस रुपयांना आहे. भाजीपाल्याच्या दरात चढउतार दिसत आहे. कोबीचा हिरवागार दीड किलोचा गड्डा दहा रुपयांना आहे. सरकी तेल मात्र पुन्हा तेजीत आहे.

फेब्रुवारीचा पहिला आठवडा संपत आल्याने उष्म्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वच शीत पेयांची मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात लिंबूचे दर दोन रुपये झाला आहे. मागील आठवड्यात एक ते दीड रुपये दर होता. अद्याप हिरव्या पाठीच्या कलिंगडे बाजारात दिसत नाहीत. काळ्या पाठीच्या कलिंगडेची आवक मोठ्या प्रमाणात आहे. किरकोळ बाजारात वीस रुपये दर असून, गोडीला चांगली असल्याने उठावही चांगला आहे. द्राक्षांची आवकही वाढू लागली आहे. किरकोळ बाजारात ३० पासून ६० रुपये किलोंपर्यंत दर राहिला आहे. ‘माल्टा’, ‘संत्री’, ‘मोसंबी’, ‘चिक्कू’, ‘बोरे’ याचे दर स्थिर आहेत.

भाजीपाल्यामध्ये कोबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. स्थानिक कोबीची आवक जास्त असल्याने घाऊक बाजारात सरासरी तीन रुपये, तर किरकोळ बाजारात सात रुपये किलोने विक्री करावी लागत आहे. वांग्याच्या दरातही घसरण झाली आहे. टोमॅटो वीस रुपये किलो असून, हिरवा वाटाणा मात्र तेजीत आहे. कारली, भेंडी, ढब्बू, घेवडा, गवार, दोडक्याच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. फ्लॉवरची आवक जास्त असल्याने दर कोसळले आहेत. घाऊक बाजारात बारा नगाचे पोते ५० रुपयांनी विक्री करावी लागत आहे. पालेभाज्यांचे दर तुलनेत स्थिर आहेत. मेथी व पोकळा दहा रुपये पेंढी आहे.

बटाट्याच्या दरात घसरण

बटाट्याच्या दरात काहीसी घसरण दिसत आहे. किरकोळ बाजारात २० पासून ३० रुपये किलोंपर्यंत दर आहे. कांदा २ पासून ४० रुपयांपर्यंत स्थिर आहे.

फोटो ओळी :

कोल्हापुरात रविवारी कलिंगडेची आवक वाढली आहे. हिरव्या पाठीच्या कलिंगडेला मागणीही चांगली राहिली. (फोटो-०७०२२०२१-कोल-बाजार) (छाया- नसीर अत्तार)

Web Title: Increased inflow of watermelon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.