विद्यार्थ्यांसह पालकांची घालमेल वाढली -राजस्थानमधील विद्यार्थ्यांना आणणाऱ्या गाड्या अद्याप डेपोतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:01 AM2020-04-29T11:01:34+5:302020-04-29T11:05:36+5:30
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी त्यातील काही विद्यार्थी आपआपल्या घरी परतले असून, सध्या तिथे १७६४ विद्यार्थी अडकले आहेत. महाराष्ट सरकारने केंद्र सरकारकडे या विद्यार्थ्यांना महाराष्टत आणण्यासाठी परवानगी मागितली आहे.
कोल्हापूर : आयआयटी, मेडिकलच्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्टत आणण्यासाठी राज्य सरकारने धुळे एस. टी. महामंडळाच्या गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. मात्र, मंगळवारी सायंकाळ पर्यंत केंद्र सरकारचे आदेश न आल्याने धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गाड्या न सोडल्याने विद्यार्थ्यांची घालमेल वाढली आहे.
‘आयआयटी’, मेडिकलसह इतर अभ्यासक्रमांच्या तयारीसाठी संपूर्ण देशभरातील विद्यार्थी कोटा (राजस्थान) मध्ये येतात. महाराष्टतूनही हजारो विद्यार्थी तिथे अभ्यासासाठी जातात. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी त्यातील काही विद्यार्थी आपआपल्या घरी परतले असून, सध्या तिथे १७६४ विद्यार्थी अडकले आहेत. महाराष्टÑ सरकारने केंद्र सरकारकडे या विद्यार्थ्यांना महाराष्टत आणण्यासाठी परवानगी मागितली आहे.
एस. टी. महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी धुळे बसस्थानकातील ९१ बसेस तयार ठेवल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी सांगितले. त्यानुसार धुळे बसस्थानकात मंगळवारी सकाळपासून बसेस सरकारच्या आदेशाच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत. धुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, केंद्र सरकारकडून अद्याप परवानगी न आल्याने बसेस सोडता येत नसल्याचे सांगण्यात आले.