करारानुसार वाढीव मजुरीची घोषणा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:48+5:302020-12-11T04:52:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील यंत्रमाग उद्योगातील कामगारांना मागील दोन महागाई भत्त्याची रक्कम पीस रेटवर बदलून १ जानेवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील यंत्रमाग उद्योगातील कामगारांना मागील दोन महागाई भत्त्याची रक्कम पीस रेटवर बदलून १ जानेवारी २०२१ ला जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन लालबावटा जनरल कामगार युनियनने सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना दिले.
निवेदनात, २८ फेब्रुवारी २०१३ मध्ये मजुरीवाढीचा करार झाला होता. त्या कराराप्रमाणे दरवर्षी महागाई भत्ता व पिकास होणारी मजुरीची घोषणा सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून करावी, असा निर्णय झाला होता. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत एकूण महागाई भत्त्यात ६०९ रुपयांची वाढ झाली आहे. ती १ जानेवारी २०२० ला घोषित करावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात भरमा कांबळे, शिवगोंडा खोत, दत्ता माने, सुभाष कांबळे, गोपाल पोला, बंडा पाटील, आदींचा समावेश होता.