बदलत्या काळात विकृती वाढतेय

By admin | Published: January 24, 2017 12:24 AM2017-01-24T00:24:51+5:302017-01-24T00:24:51+5:30

इंद्रजित देशमुख : डी. सी. नरके विद्यानिकेतनचा सांस्कृतिक कार्यक्रम

Increases abnormalities in the changing times | बदलत्या काळात विकृती वाढतेय

बदलत्या काळात विकृती वाढतेय

Next

कोपार्डे : बदललेल्या काळात विकृत प्रवृत्ती वाढली आहे. मनोरंजनाची अनेक माध्यमे युवा पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत. चांगले घर असण्यासाठी आपल्या मुलांना प्रेमळ स्पर्शाबरोबर कडक नजरेत ठेवा. आपल्या मुलांचे मालक होण्यापेक्षा विश्वस्त झाल्यास सुसंस्कृत पिढी तयार होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी काढले.
कुडित्रे (ता. करवीर) येथील डी. सी. नरके विद्यानिकेतनच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित देशमुख बोलत होते. यावेळी इंडियन डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने अरुण नरके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके व प्राचार्य बी. डी. खडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
अरुण नरके म्हणाले, प्रत्येक माणूस हा सर्वगुणसंपन्न असतो; पण त्यांच्या गुणांना वाव देणारे व्यासपीठ हवे असते, काहींना ते नशिबाने मिळते, तर काहीजण आपल्या कष्टाने जगासमोर आपले अस्तित्व निर्माण करतात. चांगले करण्याची ज्यांची मानसिकता असते त्याला समाजाचा आधार व प्रेम मिळते. यासाठी निर्मिती व्यवस्था आपल्या हातून घडली पाहिजे.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुंभी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जी. आर. पाटील, एस. वाय. पाटील, सचिव पी. टी. पाटील, पी. डी. पाटील, जयश्री नरके, ‘कुंभी’चे संचालक आनंदराव माने, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Increases abnormalities in the changing times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.