डॉक्टर आणि रुग्णांमधील वाढते अंतर चिंताजनक

By admin | Published: May 5, 2017 12:11 AM2017-05-05T00:11:03+5:302017-05-05T00:11:03+5:30

जयंत पाटील : इस्लामपुरात मिश्रा यांना ‘धन्वंतरी’ पुरस्कार प्रदान

Increasing distance between doctors and patients is worrisome | डॉक्टर आणि रुग्णांमधील वाढते अंतर चिंताजनक

डॉक्टर आणि रुग्णांमधील वाढते अंतर चिंताजनक

Next

इस्लामपूर : समाजामध्ये डॉक्टर व रूग्णांमधील अंतर वाढत आहे, ही चितेंची बाब आहे़ थोर धन्वंतरी डॉ़ व्ही़ एस़ नेर्लेकर यांच्यासारख्या धन्वंतरींची तत्त्वे व आदर्शातून डॉक्टर व रूग्णांमधील हे अंतर कमी होऊ शकते, असा विश्वास माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. खून, मारामाऱ्यांमध्ये रस असणाऱ्या वाळवा तालुक्यातील लोक आता आपली मुले डॉक्टर, अभियंते, अधिकारी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहून समाधान वाटते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
येथील राजारामबापू नाट्यगृहामध्ये डॉ़ व्ही़ एस़ नेर्लेकर यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त डॉ़ व्ही़ एस़ नेर्लेकर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना आ़ पाटील यांच्याहस्ते ‘धन्वंतरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते़ सांगलीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ संजय साळुंखे, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा़ शामराव पाटील, सभापती सचिन हुलवान, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ़ बाळासाहेब नेर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ़ संजय साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी लिंबाजी पाटील, रणजित पाटील, अ‍ॅड़ बी़ डी़ पाटील, ए़ वाय़ क्षीरसागर, धोंडीराम जाधव, मंगला नेर्लेकर, डॉ़ एऩ टी़ घट्टे उपस्थित होते़ प्रा़ राजा म्हाळगी यांनी मानपत्र वाचन केले़ अनिल खटावकर यांनी सूत्रसंचालन केले़ एस. एऩ पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)


अध्यात्म-विज्ञान पूरक : वेदप्रकाश मिश्रा
डॉ़ वेदप्रकाश मिश्रा यांचे ‘स्वामी विवेकानंद-एक अद्भूत आध्यात्मिक व वैज्ञानिक’ या विषयावर व्याख्यान झाले़ ते म्हणाले की, अध्यात्म व विज्ञान एकमेकांना पूरक आहे, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. अध्यात्म म्हणजे स्वत:ची ओळख करून घेणे़ आपण आपल्याबद्दल सांगतो एक, असतो दुसरेच आणि असायला हवे वाटते ते असते तिसरेच़ याबद्दल चिंतन व्हायला हवे़ डॉ़ व्ही़ एस़ नेर्लेकर यांची परंपरा व आदर्शांचे पालन करीत वैद्यकीय क्षेत्रात अधिक योगदान देऊ.

Web Title: Increasing distance between doctors and patients is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.