विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन, हुक्केरी येथील मुख्याध्यापक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 05:23 PM2020-05-13T17:23:16+5:302020-05-13T17:27:05+5:30
विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या हुक्केरी येथील सरकारी उच्च कन्नड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला चिकोडीचे डीडीपीआय गजानन मंणीकेरी यांनी निलंबित केले आहे.
बेळगाव : विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या हुक्केरी येथील सरकारी उच्च कन्नड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला चिकोडीचे डीडीपीआय गजानन मंणीकेरी यांनी निलंबित केले आहे.
हुक्केरी गावातील किल्ला भागातील सरकारी आदर्श उच्च प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेचा मुख्याध्यापक भिमाप्पा बंदायी असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. सरकारी आदर्श उच्च प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापक भीमाप्पा बंदायी यांच्याबद्दल अनेक विद्यार्थिनींनी तक्रारी केल्या होत्या.
विद्यार्थिनींशीअसभ्य वर्तन करणे , अश्लिल बोलणे ,त्याप्रमाणे विद्यार्थिनींना नको तिथे स्पर्श करत असल्याची लेखी तक्रार विद्यार्थिनीनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती . या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करुन बीईओ मोहन दंडीन यांनी सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालकांना याचा रिपोर्ट सादर केला होता.
या रिपोर्टनुसार डीडीपीआय गजानन मणिकेरी यांनी शिक्षक भीमाप्पा बंदायी याना निलंबित करण्याचा आदेश बजावला आहे.