गडहिंग्लजला सेवानिवृत्त कामगारांचे बेमुदत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 10:50 AM2021-01-15T10:50:57+5:302021-01-15T10:53:36+5:30
Gadhinglaj SugerFactory Kolhapur- आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून थकित फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीसाठी सेवानिवृत्त कामगारांनी येथील प्रांतकचेरीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याकडून थकित फायनल पेमेंट व ग्रॅच्युइटीसाठी सेवानिवृत्त कामगारांनी येथील प्रांतकचेरीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.
२०१३ पासून कारखाना ब्रिस्क फॅसिलिटीज प्रा. लि.कंपनीला सहयोग तत्वावर चालवायला देण्यात आला आहे. परंतु, तत्पूर्वी व त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचे मिळून सुमारे १७ कोटी रुपये थकीत आहेत.त्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.ठोस आश्वासन मिळेपर्यंत धरणे सुरूच ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.
यावेळी सेवानिवृत्त कामगार संघटनेचे प्रमुख चंद्रकांत बंदी, माजी संचालक शिवाजी खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गडयान्नावर, शिवसेनेचे दिलीप माने गणपतराव डोंगरे यांची भाषणे झाली.
दरम्यान,गडहिंग्लज साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक मेंडुले, जनरल सेक्रेटरी शशिकांत चोथे, विजय रेडेकर, अरुण शेरेकर सुरेश कब्बुरी, अशोक नाईक यांनीही आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनाला पाठिंबा दिला.
आंदोलनात सुभाष पाटील, बाळासाहेब मोहिते, बबन पाटील, आनंदराव नलवडे, सुरेश पाटील, लक्ष्मण देवार्डे, बाळासाहेब लोंढे, बाबुराव पाटील, रणजित देसाई, आदींसह सेवानिवृत्त कामगार सहभागी झाले होते.
४ फेब्रुवारीला पुन्हा बैठक!
बुधवारी (१३) याच प्रश्नावर कामगार आयुक्त कार्यालयात कारखाना,कंपनी व सेवानिवृत्त कामगारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली.परंतु,त्यात तोडगा निघाला नाही. त्यासाठी पुन्हा ४ फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती बंदी यांनी यावेळी दिली.