पोर्लेत २५ वर्षांनंतर सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:47+5:302021-01-19T04:25:47+5:30

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील पंचवीस वर्षांच्या कासारी गटाच्या सत्तेला सुरूंग लावत महाविकास आघाडीने ...

Independence after 25 years in Porlet | पोर्लेत २५ वर्षांनंतर सत्तांतर

पोर्लेत २५ वर्षांनंतर सत्तांतर

Next

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील पंचवीस वर्षांच्या कासारी गटाच्या सत्तेला सुरूंग लावत महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ मसाईदेवी कासारी ग्रामविकास पॅनेलच्या विरोधात परशराम खुडे, एम. पी. चोगुले, संजय चावरेकर, राऊ काशीद, अंगद शेवाळे यांच्या मसाईदेवी महाविकास आघाडी पॅनेलने आव्हान उभे केले होते. प्रभाग रचनेतील बदल कासारी गटाला मारक ठरला. विविध गटांतील कुरबुरीमुळे गेली पंचवीस वर्षे सत्तेपासून वंचित असलेल्या गावातील सर्वच विरोधकांनी सत्तांतर करण्याचा चंग बांधला होता. सर्वांनी एकजुटीने काम करत कासारी गटाला धक्का दिला.

सागर चेचर, जीवन खवरे, रंजनी गुरव, गीता चौगुले, संभाजी जमदाडे, शहाजी खुडे, वनीता भोपळे, एम. एम. पाटील, अरुण पाटील, नम्रता घाटगे, सचिन चोपडे, छाया कांबळे, अनुराधा पाटील यांनी मसाईदेवी महाविकास आघाडीकडून विजय मिळवला, तर मसाईदेवी कासारी ग्रामविकास आघाडीकडून अश्विनी काशीद, अरुण पाटील, संगीता बुचडे, अश्विनी संकपाळ यांनी विजय मिळवला.

Web Title: Independence after 25 years in Porlet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.