भुदरगड तालु्क्यात स्वातंत्र्यदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:10+5:302021-08-17T04:29:10+5:30

तहसीलदार आणि प्रांत कार्यालयाच्या समोरील ध्वजारोहण तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्या हस्ते, नायब तहसीलदार एम. ए. शिंदे, अव्वल कारकून ...

Independence Day in Bhudargad taluka | भुदरगड तालु्क्यात स्वातंत्र्यदिन

भुदरगड तालु्क्यात स्वातंत्र्यदिन

Next

तहसीलदार आणि प्रांत कार्यालयाच्या समोरील ध्वजारोहण तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्या हस्ते, नायब तहसीलदार एम. ए. शिंदे, अव्वल कारकून एल. यु. बिकड, राहुल पाटील, सुरेश गुरव, एस. एस. तिकोडे, एस. पी. पोवार, उत्तम खापरे, राजू कुंभार, अविनाश कांबळे, अमोल तेली, संदीप आबिटकर, आबाजी पोवार, अनिल खुटावळे, तलाठी राजू शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

पोलीस ठाण्यासमोरील ध्वजारोहण पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते झालेे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सतीश मयेकर, अमित देशमुख, दत्ता शिंदे, तुकाराम सूर्यवंशी, सतीश पाटील, किरण पाटील, दयानंद बेनके यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

पंचायत समिती भुदरगड

सभापती आक्काताई नलवडे यांच्या हस्ते, तर उपसभापती अजित देसाई, सर्व सदस्य, गटविकास अधिकारी एस. जे. पवार, सहायक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र चौगले, शिक्षण विस्ताराधिकारी दीपक मेंगाने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यत्नाळकर, पी. ओ. पोवार, उपअभियंता डी. व्ही. कुंभार, उपअभियंता जी. डी. कुंभार, बाल विकास प्रकल्प अधिकारी नयता इंगोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मौनी विद्यापीठ

येथील ध्वजारोहण व्यवस्थापन समिती चेअरमन आशिष कोरगावकर, सोबत संचालक डॉ. आर. डी. बेलेकर, नूतन संचालक बाजीराव चव्हाण, प्रा. दीपक खोत, शालिनीताई देसाई, व्ही. जे. कदम, संस्थाप्रमुख प्राचार्य पी. बी. पाटील, प्राचार्य अर्जुन आबिटकर, कृषी समितीचे चेअरमन खंडेराव घाटगे उपस्थित होते.

गारगोटी ग्रामपंचायत

गारगोटी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील ध्वजारोहण सरपंच संदेश भोपळे यांच्या हस्ते, तर उपसरपंच स्नेहल कोटकर, सचिन देसाई, प्रकाश वास्कर, जयवंत गोरे, अलंकेश कांदळकर, रुपाली कुरळे, आशालता भाट, अस्मिता कांबळे, सर्जेराव मोरे, रणधीर शिंदे यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी रमेश लोकरे, सर्व कर्मचारी उपस्थित होते.

मडिलगे बुद्रुक ग्रा.पं. कार्यालय

येथील ध्वजारोहण सरपंच शुभांगी परीट यांच्या हस्ते, तर उपसरपंच महेंद्र देसाई, ग्रामविकास अधिकारी जी. डी. आरडे, ‘गोकुळ’चे संचालक नंदकुमार ढेंगे, राहुरी विद्यापीठाचे शासकीय प्रतिनिधी दत्ताजीराव उगले, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव ढेंगे, ‘बिद्री’चे माजी संचालक सुनील कांबळे, युवराज सुर्वे, बाबूराव कांबळे उपस्थित होते.

बळीराजा ॲकॅडमी गंगापूर

येथील ध्वजारोहण संस्थेचे माजी अध्यक्ष अमृत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गारगोटीत "शाश्वत"सह विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण करत हुतात्म्यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिक स्तंभाला ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर क्रांतिज्योतीला भुदरगडचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. बी. बी. सोळसे, सचिव प्राचार्य बी. एस. माने, आनंदराव देसाई व सदस्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

Web Title: Independence Day in Bhudargad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.