कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:47+5:302021-08-17T04:28:47+5:30

‘आयसीएआय कोल्हापूर’मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा कोल्हापूर : येथील दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकौटंटस् ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कोल्हापूर शाखेमध्ये रविवारी ...

Independence Day celebrations at Karmaveer English Medium School | कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

Next

‘आयसीएआय कोल्हापूर’मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

कोल्हापूर : येथील दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकौटंटस् ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कोल्हापूर शाखेमध्ये रविवारी भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए तुषार अंतुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जानेवारी २०२१मध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाखेच्या व्यवस्थापकीय समिती सदस्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाखेचे सचिव सीए चेतन ओसवाल, शाखा व्यवस्थापक स्वप्नील सादळे, आदी उपस्थित होते. माजी अध्यक्ष सीए अनिल चिकोडी यांनी आभार मानले.

फोटो (१६०८२०२१-कोल-सीए असोसिएशन) : कोल्हापुरात रविवारी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीए अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आयसीएआयच्या कोल्हापूर शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सीए चेतन ओसवाल, तुषार अंतुरकर, अनिल चिकोडी उपस्थित होते.

Web Title: Independence Day celebrations at Karmaveer English Medium School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.