शिरोळ तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:14+5:302021-08-17T04:29:14+5:30

जयसिंगपूर झेले हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक डी. पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आदिनाथ होसकल्ले, दादा पाटील-चिंचवाडकर, एफ. वाय. कुंभोजकर, ...

Independence Day celebrations in Shirol taluka | शिरोळ तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

शिरोळ तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

Next

जयसिंगपूर झेले हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक डी. पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आदिनाथ होसकल्ले, दादा पाटील-चिंचवाडकर, एफ. वाय. कुंभोजकर, उद्योगपती विनोद घोडावत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

तमदलगे (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय विद्यालय येथे दत्तात्रय कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कोथळी (ता. शिरोळ) येथील मंगेशनगर विद्यामंदिरमध्ये जीवन आवळे व श्रेया आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मातोश्री संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी मुख्याध्यापक कैलास राठोड यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले. यावेळी मुख्याध्यापक ए. पी. कांबळे, विनायक कांबळे, पी. डी. धनवडे, जी. डी. धनवडे, सागर कांबळे, मनोहर धनवडे, दगडू धनवडे, शशांक धनवडे उपस्थित होते.

शिरोळ येथील पंचायत समिती कार्यालयात पं. स. सभापती दीपाली परीट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसभापती राजगोंडा पाटील, गटविकास अधिकारी शंकर कवितके उपस्थित होते. तहसील कार्यालयासमोर तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. शिरोळ नगरपालिकेत नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. हेरवाड (ता. शिरोळ) येथे सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ग्रामसेविका पल्लवी कोळेकर, तलाठी आय. बी. मुल्ला यांच्यासह ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.

फोटो - १६०८२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - तमदलगे (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय विद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

Web Title: Independence Day celebrations in Shirol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.