बालकल्याण संकुलात स्वातंत्र्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:28 AM2021-08-17T04:28:51+5:302021-08-17T04:28:51+5:30

कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुलात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोल्हापूर पाटीदार युवक मंडळाचे अध्यक्ष हरेशभाई ...

Independence Day at the Child Welfare Complex | बालकल्याण संकुलात स्वातंत्र्य दिन

बालकल्याण संकुलात स्वातंत्र्य दिन

Next

कोल्हापूर : येथील बालकल्याण संकुलात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोल्हापूर पाटीदार युवक मंडळाचे अध्यक्ष हरेशभाई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मा तिवले यांनी केले.

संस्था ज्या सुविधा पुरविते त्याचा लाभ होऊन मुलांनी संस्थेबरोबरच राष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पटेल यांनी केले. यावेळी विश्वस्त व्ही.बी. पाटील, सुरेश शिपूरकर, व्यंकप्पा भोसले, सहकार्यवाह एस.एन.पाटील, निरंजन वायचळ, डॉ. वैशाली नानिवडेकर, भिकालालभाई पटेल, संस्थेच्या अधिक्षिका अश्विनी गुजर, द्रौपदी पाटील, सचिन माने, नजिरा नदाफ, मीना कालकुंद्रे, टी.एम.कदम, स्मिता वायचळ आदी मान्यवर उपस्थित होते. अधीक्षक पी.के. डवरी यांनी आभार मानले.

फोटो : १६०८२०२१-कोल-बालकल्याण संकुल

कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात रविवारी कोल्हापूर पाटीदार युवक मंडळाचे अध्यक्ष हरेशभाई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Independence Day at the Child Welfare Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.