गडहिंग्लज विभागात स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:05+5:302021-08-17T04:29:05+5:30

येथील पोलीस परेड मैदानावर प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याहस्ते, तहसील कार्यालयात तहसीलदार दिनेश पारगे यांच्याहस्ते, नगरपालिकेत नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी ...

Independence Day festivities in the Gadhinglaj section | गडहिंग्लज विभागात स्वातंत्र्यदिन उत्साहात

गडहिंग्लज विभागात स्वातंत्र्यदिन उत्साहात

Next

येथील पोलीस परेड मैदानावर प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याहस्ते, तहसील कार्यालयात तहसीलदार दिनेश पारगे यांच्याहस्ते, नगरपालिकेत नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याहस्ते, गडहिंग्लज पंचायत समितीमध्ये सभापती रूपाली कांबळे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. देशातील लाल किल्ला व राष्ट्रपती भवन येथील ध्वजानंतर आकाराने मोठा असणाऱ्या सामानगड येथील शासकीय ध्वजारोहण पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्याहस्ते झाले. शहरातील किलबिल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सहायक शिक्षक यल्लाप्पा देसाई यांच्याहस्ते, गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक एस. एन. देसाई यांच्याहस्ते, डॉ. घाळी महाविद्यालयात संस्था उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. शिवराज महाविद्यालयात संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्याहस्ते, ई. बी. गडकरी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. आर. पी. डिसोझा यांच्याहस्ते, क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये संस्थाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई यांच्याहस्ते, श्री. रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीमध्ये संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात माजी सैनिक साताप्पा पुजारी यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. हसूरचंपू येथील प्राथमिक शाळेत आशा वर्कर्स रेश्मा कांबळे व संगीता नांगनुरे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. नूल येथे ग्रामपंचायतीत सरपंच प्रियांका यादव यांच्याहस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मंगल पाटील, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा नडगदल्ली, रामलिंग हायस्कूलमध्ये डॉ. स्वप्निल चव्हाण, हिरण्यकेशी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संजीवनी मांजरेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. शिव-पार्वती दूध संस्थेत आप्पासाहेब देसाई, कामधेनू दूध संस्थेत साताप्पा लगळी, लक्ष्मी पतसंस्थेत विनोद नाईकवाडी, बलभीम सेवा संस्थेत रामगोंडा पाटील यांच्याहस्ते, तर नेहरू चौकात प्रार्थना शहा यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. येणेचवंडी ग्रामपंचायतीत सरपंच भारत झळके, प्राथमिक शाळा तानाजी कुराडे, ज्ञानदीप वाचनालयात संजय बिरंजे, भवानी माता दूध संस्थेत वनिता कुराडे, जयभवानी दूध संस्थेत तानाजी बिरंजे, पांडुरंग सेवा संस्थेत बाळेश नाईक यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.

हलकर्णी : तेगिनहाळ ग्रामपंचायतीत परशुराम बाडकर यांच्याहस्ते, कुमार विद्यामंदिर शाळेत सरपंच रेखा चौगुले यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी महापुरात पुराच्या पाण्यात पोहत जाऊन वीजजोडणी करणारे वायरमन हर्षद सुदर्शने, शाळा रंगरंगोटी देणगीदार धोंडिबा चौगुले, शिवाजी नौकुडकर यांचा सत्कार झाला. नंदनवाड दीपक पुजारी यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.

चंदगड तालुका ध्वजारोहण

चंदगड : चंदगड तहसील कार्यालयात तहसीलदार विनोद रणावरे यांच्याहस्ते, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्याहस्ते, पंचायत समिती कार्यालयात सभापती अ‍ॅड. अनंत कांबळे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष प्राची काणेकर यांच्याहस्ते, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्य आर. आय. पाटील यांच्याहस्ते, मजरे कार्वे प्राथमिक शाळेत निंगाप्पा बोकडे यांच्याहस्ते, ग्रामपंचायतीत सरपंच शिवाजी तुपारे यांच्याहस्ते, म. फुले विद्यालयात मुख्याध्यापक एम. एम. गावडे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. कालकुंद्री येथे सरस्वती विद्यालयात मुख्याध्यापक व्ही. जी. तुपारे यांच्याहस्ते, तावरेवाडीत सरपंच माधुरी कागणकर, यावेळी उपसरपंच गणपत खणगुतकर यांच्याहस्ते, अडकूर ग्रामपंचायतीत सरपंच यशोदा कांबळे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. कोवाडमध्ये सरपंच अनिता भोगण यांच्याहस्ते, शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायतीत सरपंच नितीन पाटील यांच्याहस्ते, शिवनेरी येथील ताम्रपर्णी विद्यालयात मुख्याध्यापक ए. जी. बोकडे यांच्याहस्ते, हेरे सह्याद्री विद्यालयात मुख्याध्यापक सुरेश सातवणेकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.

फोटो ओळी : गडहिंग्लज नगरपालिका आवारात नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी तिरंग्याला अभिवादन करताना नगरसेवक, विविध खात्याचे अधिकारी व पालिका कर्मचारी. (मज्जीद किल्लेदार) क्रमांक : १८०६२०२१-गड-०२

Web Title: Independence Day festivities in the Gadhinglaj section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.