Independence Day : कोल्हापूर जिल्ह्यात ‘हाय अर्लट’; वाहनांची कसून तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:42 AM2018-08-14T10:42:55+5:302018-08-14T10:46:12+5:30

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांत ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना दिले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात येणार आहे.

Independence Day: 'High Earl' in Kolhapur district; Check the vehicles carefully | Independence Day : कोल्हापूर जिल्ह्यात ‘हाय अर्लट’; वाहनांची कसून तपासणी करा

Independence Day : कोल्हापूर जिल्ह्यात ‘हाय अर्लट’; वाहनांची कसून तपासणी करा

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात ‘हाय अर्लट’; वाहनांची कसून तपासणी कराविश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आदेश

कोल्हापूर : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांत ‘हाय अर्लट’ राहण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना दिले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिसांना सर्तक राहून नाकाबंदीसह गुन्हेगारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार नांगरे-पाटील यांनी कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथील पोलीस अधीक्षकांना सर्तक राहण्याच्या सूचना देत कठोर कारवाईचे निर्देश दिले. गुन्हेगारी वास्तव असलेल्या झोपडपट्ट्यांसह संवेदनशील ठिकाणी झाडाझडती घ्यावी.

दंगल काबू पथकाद्वारे संचलन करावे, सीमारेषेसह प्रत्येक नाक्यांवर व चौकांत पोलिसांची फौज तैनात करावी. नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करावी, आदी सूचना नांगरे-पाटील यांनी दिल्या आहेत.
 

 

Web Title: Independence Day: 'High Earl' in Kolhapur district; Check the vehicles carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.