स्वातंत्र्यदिन पत्रके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:29 AM2021-08-17T04:29:35+5:302021-08-17T04:29:35+5:30

कोल्हापूर : जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ, कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक वारस संघटना आदी संघटनांमार्फत स्वातंत्र्यदिनानिमित्त ॲड. उदय पाटील यांच्या हस्ते ...

Independence Day leaflets | स्वातंत्र्यदिन पत्रके

स्वातंत्र्यदिन पत्रके

Next

कोल्हापूर : जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ, कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक वारस संघटना आदी संघटनांमार्फत स्वातंत्र्यदिनानिमित्त ॲड. उदय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी प्रा. सदाशिव मनुगडे व अध्यक्ष सुंदरराव देसाई, सखाराम सुतार यांची प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी सविता देसाई, हिंदुराव पोवार, विष्णुपंत अंबपकर, सुधीर चिकोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती

कोल्हापूर : मार्केट यार्ड परिसरातील शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनानिमित्त समितीचे अशासकीय प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के.पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सदस्य दगडू भास्कर, मानसिग पाटील, सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहुल सूर्यवंशी, के.बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो :१६०८२०२१-कोल-बाजार समिती

बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकाजवळील बॅंक ऑफ बडोदा, क्षेत्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त क्षेत्रीय प्रमुख मयंक कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपक्षेत्रीय प्रमुख किशोर बाबू, मुख्य प्रबंधक मोहसीन शेख, सुरक्षा अधिकारी सुहास खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो : १६०८२०२१-कोल-बँक ऑफ बडोदा

ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम)

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील ब्राह्मणसभा करवीर मंगलधाम येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्था अध्यक्ष नंदकुमार मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपाध्यक्ष संतोष कोडोलीकर, कार्यवाह डाॅ. श्रीकांत लिमये, सहकार्यवाह अशोक कुलकर्णी, खजानीस रामचंद्र टोपकर, माजी अध्यक्ष भालचंद्र अष्टेकर, व्यवस्थापक अशोक जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मी भारतीय’ अंतर्गत ७५ किलो जिलेबी वाटप

कोल्हापूर : देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त मी भारतीय या मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध ठिकाणी ७५ किलो जिलेबी वाटप करण्यात आली.

यामध्ये बालकल्याण संकुल, सर्व पोलीस ठाणे, एसटी कर्मचारी, डीओटी कोविड सेंटर, कोल्हापूर थाळी, शिवाजी विद्यापीठ सुरक्षा कर्मचारी, कुष्ठरोग निर्मूलन संस्था, सीपीआर ऑक्सिजन पुरवठा कर्मचारी व करुणालय संस्था शिये आदी ठिकाणांचा समावेश आहे. यावेळी सुजीत प्रभावळे, रमेश पाटील, प्रवीण सोनवणे, विशाल कोरडे, सुशील घोटणे, अनिकेत सावंत, अनिकेत कोळी, दिलीप प्रभावळे, समीर लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो : १६०८२०२१-कोल-एस.टी

महात्मा फुले हायस्कूल

कोल्हापूर लक्षतीर्थ वसाहतीतील महात्मा फुले हायस्कूलमध्ये ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक आनंदराव खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका एल.एम. पोवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ॲग्लो उर्दू हायस्कूल

कोल्हापूर : शिरोली पुलाची येथील ॲग्लो उर्दू हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय समिती चेअरमन मलिक ईलाही बागवान यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर,संस्थेचे उपाध्यक्ष आदील फरास, जहागीर पन्हाळकर, वसीम बागवान, इकबाल मोमीन, इम्तियाज बागवान, इर्शाद बागवान, सरदार मुल्ला, मामाजी कच्छी, मुख्याध्यापक एन.एच. मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते.

सरस्वती चुनेकर विद्यामंदिर

कोल्हापूर : तोरणानगरातील सरस्वती चुनेकर विद्यामंदिरात संस्था संचालिका मनीषा दमामे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका पूजादेवी आपटे यांच्यासह शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Independence Day leaflets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.