आयएमए कोल्हापूरचा स्वतंत्र महिला डॉक्टर विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:31 AM2021-06-09T04:31:08+5:302021-06-09T04:31:08+5:30
कोल्हापूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने स्वतंत्र महिला डॉक्टर विभाग स्थापन करण्यात आला आहे. राज्य पातळीवर अशा प्रकारचा ...
कोल्हापूर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने स्वतंत्र महिला डॉक्टर विभाग स्थापन करण्यात आला आहे. राज्य पातळीवर अशा प्रकारचा विभाग स्थापन करण्यात आला असून डॉ. आशा जाधव यांची या राज्यस्तरीय सन्माननीय पदावर निवड करण्यात आली आहे. डॉ. जाधव यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.
२०२१-२०२२ साठी या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. नीता नरके, उपाध्यक्ष डॉ. उन्नती सबनीस , सचिव डॉ. गायत्री होशिंग, खजानीस डॉ. भारती दोशी, सहसचिव डॉ. रूपाली दळवी, सल्लागार- डॉ.प्रतिभा भूपाळी, डॉ. राधिका जोशी, डॉ. रोहिणी लिमये, डॉ. विद्युत शहा, सदस्य- डॉ. मेघना चौगुले, डॉ. मीता बुरांडे, डॉ. संजना बागडी, डॉ. रेश्मा पवार, डॉ.ईशा जाधव, डॉ. संगीता निंबाळकर, डॉ. मीनाक्षी काळे,डॉ.भारती घोटणे, डॉ. गौरी प्रसाद, डॉ.माहेश्वरी जाधव
कोट
राज्यभरात मोठ्या संख्येने महिला डाॅक्टर कार्यरत आहेत. महिला जेव्हा रुग्णालयात येतात, तेव्हा त्या महिला डाॅक्टरांशी आपल्या आजाराविषयी, आरोग्यविषयक प्रश्नांविषयी अधिक खुलेपणाने बोलू शकतात. त्यामुळे स्वतंत्र महिला विभागाच्या माध्यमातून राज्यभर महिला आरोग्य या विषयाबाबत स्वतंत्रपणे कार्य करण्यासाठी राज्यपातळीवर या विभागाची स्थापना करण्यात आली आहे. नजीकच्या काळात आजारपणातून होणारे महिलांचे मृत्यू याबाबत अधिक काम करण्यावर भर दिला जाणार आहे.
डॉ. आशा जाधव
इंडियन मेडिकल असोसिएशन अंतर्गत राज्यस्तरीय महिला डॉक्टर विभागाच्या अध्यक्ष.
०७०६२०२१ कोल वुमन डॉक्टर्स विंग
राज्यस्तरीय महिला डॉक्टर विभागाच्या अध्यक्ष डॉ. आशा जाधव यांच्यासमवेत कोल्हापूर शाखेचे पदाधिकारी.