अपक्षांनी फोडलाय मात्तबरांना घाम

By admin | Published: October 28, 2015 12:41 AM2015-10-28T00:41:27+5:302015-10-28T00:42:28+5:30

प्रचार शिगेला : कॉलन्यांमधील मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न

Independent sweat sweeter mother | अपक्षांनी फोडलाय मात्तबरांना घाम

अपक्षांनी फोडलाय मात्तबरांना घाम

Next

कळंबा : साळोखेनगर, सुर्वेनगर, राजलक्ष्मीनगर या तीन प्रभागांच्या एकत्रिकरणातून नव्याने आपटेनगर-तुळजाभवानी प्रभाग निर्माण करण्यात आला. नऊ उमेदवारांनी लढतीत वेगळाच रंग भरलाय, तर ताकदवान अपक्ष उमेदवारांनी पक्षीय उमेदवारांना घाम फोडलाय. सर्वसाधारण आरक्षणाच्या प्रभागातील लढतीचा निकाल कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.
राष्ट्रवादीकडून गौरव सावंत, भाजपकडून संगीता सावंत, काँग्रेसकडून महेश गायकवाड, शिवसेनेकडून संजय राणे, रासपकडून रवींद्र राऊत, तर राहुल काळे, राजू दिंडोर्ले, अशोक सावंत, धीरज शिंदे हे अपक्ष रिंगणात आहेत.
स्वच्छ चारित्र्याचा, व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर गौरव सावंतला राष्ट्रवादीने रिंगणात आणले आहे. पदयात्रा, रॅली, विकासकामांचा जाहीरनामा वाटप, मंडळे, युवकांची मोट बांधून तो प्रचारात आहे.
साळोखेनगर प्रभागात केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांशी वैयक्तिक संपर्कावर भर देत काँग्रेसचे महेश गायकवाड प्रचारात आहेत. शिवसेनेचे संजय राणे यांनी घर टू घर प्रचारात आघाडी घेतली आहे.
विद्यमान नगरसेविका संगीता सावंत यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांनी वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला आहे.
भाजपने तिकीट नाकारल्याने राहुल काळे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. गेली दोन वर्षे त्यांनी सामाजिक उपक्रमांचा राबता प्रभागात ठेवला होता. त्यांनीही मतदारांशी थेट संपर्काद्वारे प्रचार सुरू ठेवलाय.
अपक्ष राजू दिंडोर्ले यांनी स्वखर्चातून प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे, वाय-फाय सुविधा, महाआरोग्य मेळावा, धूर फवारणी यंत्रे, सफाई कर्मचारी नेमून निवडणुकीपूर्व विकासकामे केलीत. युवा मंडळांची मोट बांधून ते प्रचारात कार्यरत आहेत. ‘रासप’कडून रवींद्र राऊत, तर अपक्ष अशोक सावंत, धीरज शिंदे यांनी वैयक्तिक संपर्कावर जोर देत प्रचार सुरू ठेवलाय.
प्रभागात मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन मते वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुळजाभवानी, संतोष कॉलनी, गणेश कॉलनी, अयोध्या कॉलनी या ज्याच्या पाठीशी तो विजयी होणार हे निश्चित. उमेदवारांसह नेते प्रभागात पदयात्रा, कॉर्नर सभा, रॅली घेताहेत. अपक्षांसह सर्वचजण तगडे उमेदवार आहेत. मंडळांचा पाठिंबा व अर्थकारणात यशाचे गुपित दडलंय.

Web Title: Independent sweat sweeter mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.