दक्षिण कोरियातील इंचियोन ॲथलेटिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक, रिले संघात कोल्हापुरातील थेरगावच्या रिया पाटील हिचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 06:43 PM2023-06-09T18:43:41+5:302023-06-09T18:44:03+5:30
बांबवडे ( कोल्हापूर ): दक्षिण कोरियातील इंचियोन चॅम्पियनमध्ये वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकाविले. भारतीय रिले संघाने ४ ...
बांबवडे (कोल्हापूर): दक्षिण कोरियातील इंचियोन चॅम्पियनमध्ये वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकाविले. भारतीय रिले संघाने ४ बाय ४०० मीटर मध्ये ३:४०:५० सेकंदाचा कालावधी नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरले. या संघात थेरगाव तालुका शाहूवाडी येथील रिया पाटील हिचा सहभाग होता.
दक्षिण कोरियात नुकतीच ही चॅम्पियन स्पर्धा पार पडली. यामध्ये भारतीय रिले संघाने ४ बाय ४०० मीटर मध्ये ३:४०:५० सेकंदाचा कालावधी नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या संघाची रिया सदस्य होती. शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव सारख्या ग्रामीण भागातील रियाने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. रियास अभिजीत मस्कर, रामदास फराकटे, आश्लेष मस्कर ,आई -वडील, चुलते सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
रियाचे वडील कोल्हापूर येथे खासगी नोकरी करतात. ती सध्या बावडा येथे बीएससी भाग एक मध्ये शिकत आहे. सध्या ती, डब्लू आर एस क्लब मध्ये सराव करत आहे. रियाने आतापर्यंत नऊ नॅशनल गोल्ड प्राप्त केले आहेत.