प्रोटोकॉल बाजूला ठेवत राज्यपालांची चक्क भारतीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:17 PM2020-02-26T12:17:41+5:302020-02-26T12:23:06+5:30
अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथी सभाचे आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी प्रोटोकॉल बाजूला ठेवत कोल्हापूरातील कार्यक्रमात चक्क भारतीय बैठकीत विराजमान झाले.
कोल्हापूर : अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथी सभाचे आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी प्रोटोकॉल बाजूला ठेवत कोल्हापूरातील कार्यक्रमात चक्क भारतीय बैठकीत विराजमान झाले.
आचार्यश्री महाश्रमणजी यांचे तीन देश आणि वीस राज्यांमधून पदयात्रा करत मंगळवारी कोल्हापुरातील उत्तमचंद पगारिया यांच्या निवासस्थानी आगमन झाले. आज, बुधवारी मंगळवार पेठेतील भक्ती पूजानगर येथे भव्य राज्यस्तरीय नागरिक अभिनंदनाचा सोहळा पार पडला. सद्भावना नैतिकता व नशा मुक्तीसाठी झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कोश्यिारी उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील खास विमानाने या कार्यक्रमासाठी आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उच्चासनावर आचार्यश्री महाश्रमणजी होते. मात्र प्रोटोकॉलच्या बाबतीत दक्ष असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी हे त्यांच्या सन्मानार्थ शेजारीच प्रोटोकॉल बाजूला ठेवत चक्क भारतीय बैठकीत विराजमान झाले होते.
तत्पूर्वी, आचार्यश्री महाश्रमणजी यांचे पगारिया कुटुंबीय व पूर्वाश्रमीचे त्यांचे पुत्र मुनिश्री लक्षकुमारजी यांनी त्यांचे स्वागत केले. महावीर भवन, प्रतिभानगरमधून दोन किलोमीटर पदयात्रा करत कोल्हापूरच्या सकल जैन समाजाने भव्य पारंपरिक रॅली करीत आचार्यश्री यांचे उत्साहात स्वागत केले.
यावेळी मुंबई येथील भक्तांनी चारशे फूट लांब बॅनरसह जय ज्योती चरणच्या घोषणा देत आपला श्रद्धाभाव व्यक्तकेला. यावेळी आचार्यश्री, महाश्रमणजी, साध्वीप्रमुखाजी यांचेही व्याख्यान झाले. आचार्यजींच्या आगमनाने संपूर्ण जैन समाजामध्ये आध्यात्मिक व आनंदाचे वातावरण झाले आहे.