corona virus-भारतीय पथकाकडून इराणमधील पर्यटकांची वैद्यकीय तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:55 PM2020-03-06T15:55:31+5:302020-03-06T15:59:53+5:30
इराणमध्ये अडकलेल्या कोेल्हापूर, सांगली, अकलूज (सोलापूर), पुणे येथील ४४ पर्यटकांच्या वैद्यकीय तपासणी गुरुवारी रात्री भारतातून दाखल झालेल्या पथकांकडून करण्यात आली, अशी माहिती सहल आयोजक मुन्ना सय्यद यांनी दिली. हे पर्यटक भारतात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून त्यांना काही दिवस विशेष निगराणीखाली ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
कोल्हापूर : इराणमध्ये अडकलेल्या कोेल्हापूर, सांगली, अकलूज (सोलापूर), पुणे येथील ४४ पर्यटकांच्या वैद्यकीय तपासणी गुरुवारी रात्री भारतातून दाखल झालेल्या पथकांकडून करण्यात आली, अशी माहिती सहल आयोजक मुन्ना सय्यद यांनी दिली. हे पर्यटक भारतात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून त्यांना काही दिवस विशेष निगराणीखाली ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
या पर्यटकांची कोरोना विषाणू भीतीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी केली जाणार होती. त्यासाठी भारतातून वैद्यकीय पथक गुरुवारी दुपारी इराणमध्ये दाखल झाले. तेथील भारतीय वकिलातीमधील हेड आॅफ द कौन्सुलेट आकाश वानखेडे यांनी आम्हाला या पथकाबाबतची माहिती दिली. त्यासह या पर्यटकांना वैद्यकीय तपासणीला नेण्यासाठी तुमच्या हॉटेल येथे सात वाजता बस पाठविण्यात येईल, असे दूरध्वनीवरून सांगितले.
या तपासणीनंतर भारतात जाण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर आम्ही तेथून निघण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले. दरम्यान, हे पर्यटक भारतात आल्यानंतर देखील त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यांना त्वरित घरी पाठविले जाणार नाही. मुंबई, दिल्ली येथे त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. विशेष निगारणीखाली त्यांना काही दिवस ठेवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.