भारतीय खेडी देशाचा आत्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:04 AM2019-02-20T00:04:02+5:302019-02-20T00:04:07+5:30
भारत पाटील भारतीय खेडी हा देशाचा आत्मा आहे आणि म्हणूनच ग्रामीण जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी खेडी स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी ...
भारत पाटील
भारतीय खेडी हा देशाचा आत्मा आहे आणि म्हणूनच ग्रामीण जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी खेडी स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी ग्रामीण जीवनाची पुनर्निर्मिती झाली पाहिजे. याबद्दल महात्मा गांधीजी खूप आग्रही होते. आपला भारत देश भविष्यात मोजक्या शहरांत सापडणार नाही तर तो खेड्यांतही सापडेल. म्हणून खेडी जोपर्यंत विकसित होणार नाहीत; तोपर्यंत देश बदलणार नाही. अलीकडे वाढते शहरीकरण आणि कमी होणारा ग्रामीण भाग हा सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे. शासन व ग्रामीण लोकप्रतिनिधी यांचा हा नैतिक पराभव मानावा लागेल. शहरांची प्रमाणापेक्षा झालेली वाढ ही सूजच म्हणावी लागेल. शहरी विकास, जीवनशैली व शहरांचे आकर्षण हे ग्रामीण लोकांना सतत राहिले आहे. शिक्षण, व्यवसाय व रोजगाराच्या निमित्ताने खेड्यातील माणूस शहरांकडे स्थलांतर करीत आहे आणि यामुळे आपली खेडी ओस पडत चालली आहेत व शहरांची सूज मात्र बेसुमार वाढत आहे. आणि यामुळं दोन्ही ठिकाणी खूप गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामीण विकास ही तातडीची व अत्यावश्यक गरज बनली आहे. आर्थिक वाढ हा जरी विकासातील महत्त्वाचा घटक असला तरी फक्त आर्थिक विकास झाला म्हणजे सर्वांगीण विकास झाला हे म्हणणे आता चुकीचे ठरले आहे आणि म्हणून ‘विकास ही एक विविधांगी सतत चालणारी प्रक्रिया आहे’ असं मानून सर्व अंगांचा विचार करून नियोजनपूर्वक कृती आराखडा तयार केला पाहिजे. यामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व मानवी मूल्यमापनाच्या बाबतीत गुणवत्तापूर्ण बदल होतील, असे प्रभावी कार्यक्रम असावेत. भारतात पंजाब व केरळ या दोन राज्यांची सर्वांगीण विकासाची तुलना करायची झाली, तर पंजाब हे दरडोई उत्पन्नामध्ये केरळच्या पुढे प्रगतीवर आहे. परंतु साक्षरता, बाल मृत्यू दर, महिला शिक्षण व सक्षमीकरण, आरोग्य बालविकास, स्वच्छता यामध्ये केरळ पंजाबच्या खूप पुढे आहे. म्हणूनच भारतीय खेड्यांत आर्थिक वाढीबरोबरच सर्वांगीण व अंगभूत विकासाला महत्त्व दिले पाहिजे. आपल्या सर्व खेड्यांचा कृतिशील विकास आराखडा (ॠढऊढ) करायची वेळ आली आहे. कोणतेही राष्ट्र असो वा व्यक्ती त्याला स्वाभिमान, आत्मसन्मान व प्रतिष्ठा असतेच. याला समानता व स्वातंत्र्य यांची जोड असणंही खूप महत्त्वाचे आहे. आमचं गाव आम्हीच सरकार...आपला देश समृद्ध व सुंदर देश...ही भावना ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या अंगी यायलाच हवी. यासाठी ग्रामीण भागातील सर्व लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांची उंस्रंू्र३८ ु४्र’्िरल्लॅ अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी नवीन अद्ययावत प्रशिक्षण त्यांना देणे ही काळाची गरज आहे. आपले अधिकार, कर्तव्य व जबाबदारी हे समजले तरंच कार्यात सुलभता येऊ शकते. गावाचा कारभार चालवताना अधिनियम, पारदर्शकता, अद्ययावत सुविधा, नेतृत्व गुण, आदर्श गाव संकल्पना, गाव कृती आराखडा, लोकसहभाग या बाबींसाठी प्रभावी प्रशिक्षण असायलाच पाहिजे. याशिवाय स्मार्ट व्हिलेज, मॉडेल गाव, आदर्श गाव हे घडू शकत नाही. म्हणून भविष्यातील आपला गाव उभा करत असताना गावातील सर्व घटकांना प्रबोधन व प्रशिक्षण देऊन ग्रामदूतांची फौज उभी करावी लागेल. त्यांनी जसं आर्मीमधील जवान सीमेवर देशाचे रक्षण करताना अहोरात्र डोळ्यात तेल घालून उभा असतो तसं आपणही आपली गावं विकसित करण्यासाठी ती प्रेरणा.. ती ऊर्जा व तो निर्धार अंगी घेऊन कार्य करण्याची वेळ आली आहे. शहरांतील सोयी-सुविधा व संधी जर खेड्यांत उपलब्ध झाल्या; तर ग्रामीण भागाकडून शहरांकडे जाणारे लोंढे आपोआप थोपवले जातील. शैक्षणिक पात्रता, रोजगार र‘्र’’ ीि५’ङ्मस्रेील्ल३ या बाबी आता गाव कृती आराखड्यात अंतर्भूत केल्या पाहिजेत. व्यापक दृष्टिकोन यावा यासाठी गावचे कारभारी आता सक्षम झालेच पाहिजेत. ‘जे जे गावी शहाणे झाले ! शक्ती युक्तीनी पुढे निघाले ’’
(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत)