कोरोना लसीकरणामध्ये भारताचे काम कौतुकास्पद, अॅस्टर डीएम हेल्थकेअरच्या संस्थापकांचे गौरवोद्गार
By समीर देशपांडे | Published: September 22, 2022 02:46 PM2022-09-22T14:46:13+5:302022-09-22T14:46:46+5:30
कोल्हापूर : जगामधील अनेक देशांकडे प्रचंड पैसा आहे. परंतू कोरोनाची लस मोजक्या देशांना निर्माण करता आली. यामध्येही भारताने दर्जेदार ...
कोल्हापूर : जगामधील अनेक देशांकडे प्रचंड पैसा आहे. परंतू कोरोनाची लस मोजक्या देशांना निर्माण करता आली. यामध्येही भारताने दर्जेदार लस तयार करून ती केवळ भारतीयांसाठी न वापरता जगभर निर्यात केली. हे काम कौतुकास्पद आहे असे मत दुबईस्थित अॅस्टर डीएम हेल्थकेअरचे संस्थापक डॉ. आझाद मोपेन यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील अॅस्टर आधार रूग्णालयाच्या अॅनेक्स बिल्डिंगचे उद्घाटन डॅा. मोपेन यांच्या हस्ते झाले. यादरम्यान पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, भारतामध्ये १२ ठिकाणी अॅस्टरची रूग्णालये आहेत. परंतू कोल्हापूरच्या स्थानिक डॅाक्टर्सनी व्यक्त केलेल्या आत्मविश्वासामुळे आम्ही महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये येण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या मर्यादित काळात ऑक्सिजन प्लान्टसह सुविधा पुरवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली.