राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत बोरवडेच्या इंद्रजित फराकटेला ब्राँझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:25 AM2021-02-24T04:25:31+5:302021-02-24T04:25:31+5:30
इंद्रजित फराकटे याने यापूर्वी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून तो बिद्रीच्या दूधसाखर महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे. ...
इंद्रजित फराकटे याने यापूर्वी विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली असून तो बिद्रीच्या दूधसाखर महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे. राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत आज इंद्रजितने वैयक्तिक ब्राँझपदक मिळविले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राच्या संघामध्ये कोल्हापूरच्या डब्ल्यूआरएसएफचे तीन खेळाडू होते.
या स्पर्धेत सत्यजित पुजारी याने वैयक्तिक चौथा तर अभिजित देवकाते याने सहावा क्रमांक मिळविला. हे तिन्ही खेळाडू कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानावर अश्लेश मस्कर, अभिजित मस्कर व रामदास फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
फोटो ओळी
चंदीगड येथे सुरू असलेल्या ५५ व्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत ब्राँझपदक मिळवलेला इंद्रजित फराकटे.